5

लातुरात तुरीची आवक वाढली, शेतकऱ्यांना भाव पडण्याची भीती?

लातूर बाजार समितीत सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. (Tur Rate Increased In Latur)

लातुरात तुरीची आवक वाढली, शेतकऱ्यांना भाव पडण्याची भीती?
तूर
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 4:52 PM

लातूर : लातूर बाजार समितीत सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काल दिवसभरात 8 हजार 702 क्विंटल तुरीची आवक झाली. सध्या बाजार समितीत 6 हजार 166 रुपये कमाल तर 5 हजार 521  रुपये किमान भाव तुरीला मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाव पडण्याची भीती व्यक्त केली आहे. (Tur Rate Increased In Latur)

गेल्या काही दिवसांपासून लातूर बाजार समितीमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. काल दिवसभरात 8 हजार 702 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. तर 6 हजार 166 रुपये कमाल आणि 5 हजार 521 रुपये किमान भाव तुरीला मिळतो आहे. त्याशिवाय हरभऱ्याला 4 हजार 400 रुपये भाव मिळत असून सोयाबीनलाही बाजार समितीत चांगला भाव मिळत आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात 4 हजार 400 रुपये भाव सोयाबीनला मिळाला होता. सरकारने सोयाबीनला 3 हजार 870 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र लातूरच्या बाजार समितीत यापेक्षा जास्त भाव मिळू लागल्याने शेतकरी गर्दी करु लागले आहेत. (Tur Rate Increased In Latur)

राज्यात तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. सध्या नव्या तुरीची आवक सुरु झाली आहे. आवक सर्वसाधारण असली तरी दर मात्र वाढले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत अकोला, नांदेड, लातूर, जालना, अकोला, जळगाव बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढली आहे.

लातूर बाजार समितीमध्ये मंगळवारी (19 जानेवारी) तुरीची पाच हजार 20 क्विंटलची आवक होती. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार 726 क्विंटल तुरीची आवक होती. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 576 क्विंटल तुरीची आवक होती. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची 18 क्विंटल आवक झाली होती.

तुरीचे दर (रुपये/क्विंटल)

शहर – दर  (किमान/कमाल)

लातूर – ५७२५/६२२५

अकोला  – ४५००/६१५०

जालना – ५३००/५९५०

जळगाव – ५२००/५६५०

नांदेड –  ५७००/५८५०

(Tur Rate Increased In Latur) संबंधित बातम्या : 

आंध्र प्रदेशातील शेतकऱ्याचं लाखोंच उत्पन्न, मोठमोठ्या व्यावसायिकांनाही टाकलं मागं

आनंदाची बातमी; 12 हजार कोटींचा निधी मंजूर, प्रत्येक शेतकऱ्याला 4 हजार मिळणार

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?