उत्पादनापुर्वीच हळद पिवळी, साचलेल्या पाण्यामुळे कंदही जमिनीतच सडले

नांदेड जिल्ह्यात हळद हे मुख्य पिक आहे. ऊसाला पर्याय आणि उत्पादनाची हमी यामुळे दरवर्षी हळदीच्या उत्पादनात वाढ ही ठरलेलीच. यंदा जिल्ह्यात तब्बल 25 हजार हेक्टरावर हळदीची लागवड करण्यात आली होती. मात्र, गोदाकाठच्या नदी परिसरात पावसाचे पाणी साचल्याने हा हळद पिवळी पडली आहे तर हळदीचे कंदही जमिनीतच सडून गेले आहेत.

उत्पादनापुर्वीच हळद पिवळी, साचलेल्या पाण्यामुळे कंदही जमिनीतच सडले
शेतामध्ये पाणी साचल्याने हळदीचे नुकसान
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 10:05 AM

नांदेड : नांदेड जिल्ह्यात हळद हे मुख्य पिक आहे. ऊसाला पर्याय आणि उत्पादनाची हमी यामुळे दरवर्षी हळदीच्या उत्पादनात वाढ ही ठरलेलीच. यंदा जिल्ह्यात तब्बल 25 हजार हेक्टरावर हळदीची लागवड करण्यात आली होती. मात्र, गोदाकाठच्या नदी परिसरात पावसाचे पाणी साचल्याने हा हळद पिवळी पडली आहे तर हळदीचे कंदही जमिनीतच सडून गेले आहेत. कोरडीला असलेल्या पिकाचे यामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी उभे पिक वावरातून बाहेर काढत आहे.

पोषक वातावरण आणि कमी पाण्यात हळदीचे ऊत्पन्न पदरी पडते म्हणून वर्षागणिस जिल्ह्यात हळदीचे उत्पादन हे वाढत आहे. गतवर्षी 20 हजार हेक्टरावर लागवड झाली तर यंदा 25 हजार हेक्टरावर लागवड झाली. सर्व काही सुरळीत असताना मध्यंतरी झालेल्या पावसामुळे हळदीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. पुराचे बॅकवॅाटर हे गेल्या चार दिवसांपासून साचून राहिल्याने हळदीची कंदमुळे ही सडली आहेत त्यामुळे मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वावरातील उभे पिक कापण्यास सुरवात केली आहे.

गतआठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पाला पूर आला होता. शहरालगत असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु झालब होती. या जलसाठ्याचे नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पातील पाणी नदीत सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीला पूर आल्याने मुदखेड तालुक्यातील वसंतवाडी, रोहीपिंपळगाव येथील हळद ही पाण्यातच आहे. त्यामुळे त्याची कंदमुळे ही सडत असल्याने याचा उर्वरीत पिकावर परिणाम होऊ नये म्हणून सडलेली हळद ही काढून टाकली जात आहे. Turmeric in Nanded district rotten due to rainwater logging

बागायतीसह खरिपातील पिकाचे नुकसान

पाऊस होऊन गेला तरी गोदावरी नदी काठच्या उपनद्या आणि नाल्याचा पूर यामुळे पाणी साचून राहते. परिणामी साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील हजारो एकरातील पिके ही पाण्यात आहेत. केळी, हळद या बागायती बरोबरच खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांनाही साचलेल्या पाण्याचा फटका बसलेला आहे. विशेष: मुदखेड तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

म्हणून शेतकऱ्यांनी वावरातून हळद बाहेर काढली

यंदा हळदीतून अधिकचे उत्पादन पदरी पडेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. पोषक वातावरणामुळे हे शक्यही होते. मात्र, गतआठवड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आतापर्यंत शेतकऱ्यांनी एकरी 40 हजार खर्च केले आहेत. आता अधिकचा खर्च करुनही पिक पदरी पडते की नाही याची शंका असल्याने हळद काढून इतर पिक घेण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

पाणी साचल्याने कंद सडले अन् हळदही पिवळी पडली

पावसाचे तसेच गोदा नदीचे बॅकवॅाटरचे पाणी थेट मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचलेले आहे. त्यामुळे पहिल्या एक-दोन दिवसांमध्ये हळद ही पिवळी पडली तर अधिकचा काळ पाणी साचून राहिल्याने कंदमुळेही सडली आहेत.

इतर बातम्या :

टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू

चक्क पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण, नाशकात खळबळ

मित्राची हत्या करुन खिशातल्या पाचशे रुपयांची दारु आणली, गावभर बोंबलले ‘आज दो लोगो को टपका डाला’

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.