अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा नागपुरी संत्र्याला फटका; इतक्या कोटी रुपयांचे नुकसान

आधीच खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, होत्याचं नव्हतं झालंय.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा नागपुरी संत्र्याला फटका; इतक्या कोटी रुपयांचे नुकसान
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 11:46 AM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान झालंय. गहू, हरभरा, संत्रा, भाजीपाला पिकं अक्षरशः मातीमोल झालीय. त्यामुळं या अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. संत्र्याला आलेला आंबिया बहार गळून पडलाय. गारपिटीमुळं झाडावर असलेला संत्रा अक्षरशः फुटलाय. आधीच खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, होत्याचं नव्हतं झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटानं हिरावून घेतलाय.

nag orange 2

इतक्या कोटींचे नुकसान

अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीटीमुळे विदर्भात पिकाचं १०० कोटींपेक्षा रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालंय. फळबागा, संत्रा, हरभरा, गहू, भाजीपाल्याचं सर्वाधिक नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत.

हे सुद्धा वाचा

सरकारने संपावर तोडगा काढावा

अवकाळी पावसामुळे विदर्भात पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तलाठ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे पंचनामे रखडणार असल्याचंही ते म्हणाले. सरकारने तोडगा काढावा आणि त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

तलाठ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे पंचनामे रखडले

अनिल देशमुख म्हणाले, अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे विदर्भात नुकसान झाले. लवकर पंचनामे झाले पाहिजे. तलाठ्यांनी कामबंद केल्यामुळे पंचनामे रखडले आहेत. शासनाने हस्तक्षेप करून पंचनामे केले पाहिजे.

संत्रा, मोसंबीला नुकसान झाले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट उशिरा पाठवल्यामुळे मदत मिळण्यास उशीर झाला. आठ महिन्यांपासून तो प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याला सरकारने लवकर पैसे दिले पाहिजे. कालच्या नुकसानीचेही पंचनामे व्हावेत. त्यालासुद्धा मदत झाली पाहिजे, यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा, असंही देशमुख यांनी म्हंटलं.

वातावरणात गारठा

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात शनिवारपासून वादळी वारा व दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. याच्या परिणाम म्हणून गोंदिया जिल्ह्याचा पारा चांगलाच घसरला. रविवारी जिल्ह्याचे कमाल तापमान थेट 26 अंशांवर आले होते. शिवाय रविवारीही दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस असेच वातावरण राहणार असे दिसून येत आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.