निसर्गाचे दुष्टचक्र कायम : अवकाळीने फळबागांचे तर गारपिटीनं रब्बी हंगामाचे नुकसान

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारी अकोला शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. उलट गारपीटीसह पाऊस बरसल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, सुर्यफूल ही पीके बहरात असतानाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

निसर्गाचे दुष्टचक्र कायम : अवकाळीने फळबागांचे तर गारपिटीनं रब्बी हंगामाचे नुकसान
अकोला. वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 5:17 PM

अकोला : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारी अकोला, वाशिम, बुलडाणा शहरासह जिल्ह्यात ( Untimely rains) पावसाने हजेरी लावली आहे. उलट गारपीटीसह पाऊस बरसल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ( damage to rabbi crop) रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, सुर्यफूल ही पीके बहरात असतानाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. ज्वारी पीक तर पोटऱ्यात आले असून ज्वारीची कणसे भरण्यासाठी पोषक असणारा चिकटाच या पावसामुळे धुऊन गेल्याने उत्पादनात वाढ कशी होणार असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे महिन्याभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले होते तर आता गारपीट आणि पावसामुळे रब्बी हंगामातील पीके धोक्यात आहेत.

ढगाळ वातावरणामुळे घाटीअळीचा प्रादुर्भाव

अकोला शहरासह विदर्भ आणि मराठवाड्यात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, अकोला शहर आणि जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली त्यामुळे काढणीला आलेल्या तुरीचे तर नुकसान झालेच आहे पण ज्या हरभरा पिकातून शेतकऱ्यांना मोठ्या उत्पादनाच्या अपेक्षा आहेत ते पीक देखील आता धोक्यात आहे. एकतर रब्बी हंगामातील पेरण्या यंदा उशिराने झालेल्या आहेत. यातच आता पावसाने पिकांच्या वाढीवर परिणाम असून किडीचा प्रादुर्भाव हा वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये अणखीन भर पडलेली आहे.

कापूस, तुरीचे न भरुन निघणारे नुकसान

खरीपातील ही दोन्हीही पिकांची सध्या काढणी कामे सुरु आहेत. यंदा कापसाला अधिकचा दर आहे म्हणून शेतकऱ्यांनी फरदड कापसाचे उत्पादन घेतले आहे. मात्र, आता ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव तर वाढणारच आहे पण पावसामुळे कापसाच्या बोंडाचेही नुकासान झाले आहे. दुसरीकडे तुरीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काढणी झालेली तूर वावरातच पडून आहे. यापूर्वीच शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे शेंगा भरल्या नव्हत्या आता पावसामुळे तुरीचे खळेही होते की नाही अशी अवस्था झाली आहे.

खरिपानंतर रब्बी पिकांनाही पावसाचाच धोका

खरीप हंगामातील सर्वच पिके बहरात असताना अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन या मुख्य पिकासह उडीद, मूग याचेही मोठे नुकसान झाले होते. खरीपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनवर याचा सर्वाधिक परिणाम झाला होता. पावसामुळे सोयाबीन काळवंडले होते तर आता कापसाचेही पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. यापूर्वी रब्बी हंगामातील पेरणी होताच पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणी करावी लागली होती. रब्बीच्या पेरणीपासून निसर्गाचा लहरीपणा पाहवयास मिळत आहे. ज्याप्रमाणे खरिपात पावसामुळे पिकांचे नुकसान त्याचीच पुन्नरवृत्ती रब्बीतही होते की काय अशी अवस्था झाली आहे.

संबंधित बातम्या :

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट, हंगाम अंतिम टप्प्यात तरीही ऊस शेतातच उभा

Rabi Season : रब्बीच्या पिकांना वन्यप्राण्यांचा धोका, पीक संरक्षणासाठी ‘हे’ आहेत उपाय..!

Latur Market : अखेर सोयाबीनचे दर स्थिरावले, शेतकऱ्यांच्या ‘एका’ निर्णयामुळेच मिळाला अपेक्षित दर

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.