शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकू नका, सोयाबीन बियाण्याचे दर नियंत्रित करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकू नका, सोयाबीन बियाण्याचे दर नियंत्रित करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
VBA Protest

शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकू नका, उगवण क्षमता तपासूनच बियाणे विका, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. (Vanchit Bahujan Aghadi )

सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: Yuvraj Jadhav

Jun 10, 2021 | 1:19 PM

अमरावती: महाराष्ट्रात मान्सून पाऊस दाखल झाला आहे. राज्यातील 80 टक्केहून अधिक भाग मान्सूननं व्यापला आहे. मान्सून पाऊस दाखल झाल्यानं शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. शेतकऱ्यांची पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी लगबग सुरु आहे. सध्या बोगस बियाण्यांचही शेतकऱ्यांपुढे आव्हान आहे. मागील वर्षी प्रमाणे शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकू नका, उगवण क्षमता तपासूनच बियाणे विका, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. (Vanchit Bahujan Aghadi demanded fake seeds not sale to farmers)

बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका

मागील वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नकली बियाणे मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नाही. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसह मोठा आर्थिक फटका बसला होता, यावर्षी तरी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच शेतकऱ्यांना विका, म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही या मागणीसाठी अमरावती वंचित बहुजन आघाडीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

सोयाबीन बियाण्याचे भाव गगनाला

सोयाबीनच्या बियाण्याचे भाव गगनाला भिडले असून प्रति बॅग तीन हजार सातशे रुपये दराने मार्केटमध्ये विकला जात आहे. ते दर नियंत्रणात आणावे ,सोबतचजे शेतकरी कोविंड मध्ये मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना पेरणीसाठी मोफत बियाणे व खते देण्यात यावी, शेतकऱ्यांचे पानंद रस्ते दुरुस्त करावे या अशा मागणीसह वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले, असल्याची माहिती वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी सांगितलं आहे.

बियाणे खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

मान्सून दाखल झाल्यानं शेतकरी पेरणी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी करत असल्याचं चित्र आहे. मात्र, शेतकऱ्यांना हव्या तितक्या प्रमाणात बियाणं आणि खतं मिळत नसल्याच समोर आलं आहे.

सोयाबीन पेरणी कधी करावी?

खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरासरी 80 ते 100 मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. जो पर्यंत 80 ते 100 मि.मी पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी करावी? कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर, कोणत्या पिकाची MSP सर्वाधिक वाढली?

(Vanchit Bahujan Aghadi demanded fake seeds not sale to farmers)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें