AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, हवामान विभाग बघा काय सांगतंय?

हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. राज्यभरातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पहिला पाऊस पडल्यानंतर ते लगेच पेरणीची तयारी करणार आहेत. पण हवामान विभागाने त्याआधी महत्त्वाची सूचना दिली आहे.

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, हवामान विभाग बघा काय सांगतंय?
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Jun 01, 2023 | 11:30 PM
Share

पुणे : राज्यातील नागरीक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. सूर्य प्रचंड आग आकतोय. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांना उकाड्याचा त्रास होतोय. नागरिकांना आता पावसाची आस लागली आहे. विशेष म्हणजे राज्यातील शेतकरी अगदी चातका सारखी पावसाची वाट पाहायला लागले आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कारण राज्यभरातील शेतकरी कामाला लागले आहेत. हे शेतकरी रणरणत्या उन्हात शेतीचं काम करत आहेत. कुणी शेत साफ करतंय. तर कुणी ठिबक सिंचनासाठी नळ्या अंथरत आहे. प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने कामाला लागला आहे.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं संपूर्ण कुटुंब सध्याच्या घडीला शेतात राबत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या अगदी 9-10 वर्षांच्या मुलांपासून ते शेतकऱ्याची पत्नी, सून, आई-बाबा सगळ्यांचा समावेश आहे. राज्यभरात हीच परिस्थिती आहे. शेतातील कामं आटोपल्यानंतर शेतकरी पेरणीसाठी पवासाची वाट पाहणार आहेत. पण आरोग्य विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला आहे.

हवामान विभागाचं शेतकऱ्यांना नेमकं आवाहन काय?

राज्यातील शेतकऱ्यांना मान्सूनसाठी अजून 8 ते 10 दिवस वाट पहावी लागणार आहे. अंदमानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून वर सरकला आहे. मान्सून 4 जूनला केरळमध्ये दाखल होणार, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिली.

पुढच्या दोन आठवड्यात कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. तसेच यंदा सरासरी 96 टक्के इतका पाऊस पडणार आहे, अशीदेखील माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली.

यंदाच्या पावसावर अलनिनोचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा

राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. कारण राज्यभरात अवकाळी पावसाने प्रचंड त्रास दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं. शेतकऱ्यांचा चांगल्या उत्पन्नाची आस असताना अचानक आलेल्या पावसाने सारी पीकं उद्ध्वस्त केली. शेतकऱ्यांच्या अगदी तोंडातील घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं.

असं असलं तरी आता शेतकऱ्यांना आगामी काळात शेतीतून चांगलं उत्पन्न मिळेल यासाठी आशा आहे. आगामी काळात भरपूस पाऊस पडो, शेतीला बहर येवो आणि आपण कर्जमुक्त होवो, असं शेतकऱ्यांना वाटतंय. त्यामुळे येत्या पावसाकडे शेतकऱ्यांच्या अनेक अपेक्षा आहेत.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.