उत्सुकता शिघेला, दोन दिवस बाजार समित्या बंद नंतर सोयाबीन दराचे चित्र काय? तज्ञांचे शेतकऱ्यांना सल्ला

सोयाबीनच्या दराची वाटचाल विक्रमी दराकडे होत असतानाच रशिया-युक्रेनमध्ये सुरु झालेले युध्द आणि जागतिक बाजार पेठेत वाढलेली मागणी या गोष्टा दर वाढीला पोषक ठरत आहेत. त्यामुळे गतआठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरलेले दर पुन्हा सोमवारी सावरल्याचे चित्र होते. सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजार 200 चा दर मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवस बाजार समित्यांमधील व्यवहार हे बंद राहिलेले आहेत.

उत्सुकता शिघेला, दोन दिवस बाजार समित्या बंद नंतर सोयाबीन दराचे चित्र काय? तज्ञांचे शेतकऱ्यांना सल्ला
सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योग उभारले जाणार असल्याने दरात सुधारणा राहणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 3:31 PM

लातूर :  (Soybean Rate) सोयाबीनच्या दराची वाटचाल विक्रमी दराकडे होत असतानाच रशिया-युक्रेनमध्ये सुरु झालेले युध्द आणि जागतिक बाजार पेठेत वाढलेली मागणी या गोष्टा दर वाढीला पोषक ठरत आहेत. त्यामुळे गतआठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरलेले दर पुन्हा सोमवारी सावरल्याचे चित्र होते. सोमवारी (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Soybean) सोयाबीनला 7 हजार 200 चा दर मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवस बाजार समित्यांमधील व्यवहार हे बंद राहिलेले आहेत. आता दोन दिवसानंतर काय चित्र असणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. सध्या होत असलेल्या आवकचा परिणाम हा बाजारपेठेतील दरावरच होणारच नाही. कारण मागणी वाढल्याने दरात वाढ होत आहे. शिवाय रशियातून होणाऱ्या तेलाच्या आयातीवर युध्दजन परस्थितीचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनच्या मागणीत वाढ होत आहे.

प्रक्रिया उद्योजकांकडून अधिकची मागणी

सोयाबीनवर प्रक्रिया करुन तेल निर्मित करणाऱ्या कंपन्यांची संख्या लातूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या कंपन्यांकडून महिनाभर पुरेल एवढ्या सोयाबीनची साठवणूक आणि दररोजची खऱेदी केली जाते. यासाठी मंडळानिहाय खरेदी केंद्रही उभारण्यात आली आहेत. सध्या बाजारपेठेत होत असलेल्या अधिकच्या आवकचा परिणाम हा दरावर होणार आहे. त्यामुळे आवक कीतीही झाली तरी मागणी कायम असल्याने सोयाबीनचे दर हे टिकून राहणार आहेत. त्यामुळे 6 हजार 300 असलेले सोयाबीन आता 7 हजार 400 वर गेले आहे.

दोन दिवस बंदचा काय परिणाम?

गेल्या दोन दिवसांपासून बाजार समित्या ह्या बंद आहेत. त्यामुळे गुरुवारी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे. आवक मोठ्या प्रमाणात झाली तरी त्याचा दरावर परिणाम होणार नाही. यापूर्वी 5 हजार दरही शेतकऱ्यांसाठी माफक होता पण यंदा उत्पादनात झालेली घट आणि आता वाढती मागणी त्यात आंतराष्ट्रीय पातळीवरील घटना यामुळे दरात वाढ होत आहे. सोयाबीनला 7 हजार 500 हा दर चांगला असून शेतकऱ्यांनी विक्रीबाबत निर्णय घेण्यास हरकत नसल्याचा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे. शेवटी निर्णय शेतकऱ्यांचा आहे. शिवाय अजून दर वाढतील पण ते किती काळ टिकतील हे सांगता येत नसल्याचेही त्यांनी tv9 मराठी डिजीटलशी बोलताना सांगितले.

हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या मनातील दर

यंदा उत्पादन घटून दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला होता. एका गावाने तर 10 हजाराचा दर असेल तरच सोयाबीन विक्री केले जाईल असे फलकच लावले होते. हंगामाच्या सुरवातीला घेतलेला निर्णय अंतिम टप्प्यात खरा होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी 7 हजार 200 तर गुरुवारी मार्केट सुरु झाल्यावर हेच दर 7 हजार 500 जाईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : युध्दजन्य परस्थितीमुळे खतांचा तुटवडा भासणार? इतर पर्यायाच्या शोधात केंद्र सरकार

Photo: हौसेला नाही मोल..! गायीच्या डोहाळे जेवणात गावाचा सहभाग, संस्कृतीचे जतन अन् वेगळेपणही

ठरलं तर मग, व्यापारी अन् शेतकऱ्यांच्या बैठकीत पपई दराचा निर्णय, टिकणार की मोडणार..!

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.