Photo: हौसेला नाही मोल..! गायीच्या डोहाळे जेवणात गावाचा सहभाग, संस्कृतीचे जतन अन् वेगळेपणही

सांगली : भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळे असे महत्व आहे. त्याचे महत्व तर अबाधित ठेवले जात आहे पण काही शेतकरी गायीचे केवळ पालनच करीत नाहीत तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पाडत आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथे असाच डोळ्याचे पारणे फिटेल असा सोहळा महाशिवरात्रीनिमित्त रंगलेला होता. गावात प्रथमत:च असा आगळा-वेगळा कार्यक्रम संपन्न झाल्याने परिसरात तो चर्चेचा विषय बनला आहे.येथील माजी सरपंच भगवान हारुगडे यांच्या कुटुंबियांनी गायीचेच डोहाळे जेवण घातले आहे. सर्वकाही विधीवत करुन आख्ख्या गावाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. या निमित्त विविध कार्यक्रम हे हारगुडे यांच्या घरी पार पडले.

Mar 02, 2022 | 1:01 PM
शंकर देवकुळे

| Edited By: राजेंद्र खराडे

Mar 02, 2022 | 1:01 PM

महाशिवरात्रीचे मुहूर्त : मंगळवारी महाशिवराञी दिवशीच गावात या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी गावातील अनेक महिला व अबालवृद्धांनी  गर्दी केली होती. अगदी महिलांचा जसा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो तसा संपूर्ण साज याठिकाणी करण्यात आला होता. हारुगडे कुटुंबीय हे अध्यात्मिक असल्याने सुरुवातीला भजनही ठेवण्यात आले होते.

1 / 5
सर्वकाही विधीवत: महाशिवरात्री दिवशी सकाळपासून विविध कार्यंक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला मंडळ हे गायीची विधीवत पूजा करीत होते. यानंतर माञ सर्व विधी करत गायीचे नामकरण संपन्न झाले. यावेळी गाईचे नावदेखील लक्ष्मी असे ठेवण्यात आले आहे.

2 / 5
भजनाचा कार्यक्रम : गायीचे डोहाळे जेवणात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी गायीची पूजा करुन तिला फुलांनी सजवण्यात आले होते. महिलांकडून पूजा केली जात होती. लागूनच भजन, किर्तन आदी कार्यक्रम पार पडत होते.

3 / 5
यामुळे घातले गायीचे डोहाळे जेवण: सुशांत हारुगडे यांच्या आजीची खूप इच्छा होती की घरात एक देशी गाय असावी, यासाठी त्याने मिञाकडून ती गायी आणली व तिला जीवापाड प्रेम केले. संस्कृतीचे जतन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे हारुगडे कुटुंबियांनी सांगितले  आहे.

4 / 5
पंगतीवर पंगती : डोहाळे जेवण हे गायीचे असले तरी सर्व गाव या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दुपारपर्यंत विविध कार्यक्रम पार पडले आणि त्यानंतर जेवणाच्या पंगती. गावातील महिला, पुरुष आणि बच्चे कंपनी यामध्ये सहभागी झाले होते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें