AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा : युध्दजन्य परस्थितीमुळे खतांचा तुटवडा भासणार? इतर पर्यायाच्या शोधात केंद्र सरकार

रशिया-युक्रेनच्या युध्दजन्य परस्थितीचा परिणाम आता शेती व्यवसयावर होऊ लागला आहे. केवळ सूर्यफूल तेलसाठ्यावरच याचा परिणाम होणार असे नाही तर भारतामध्ये रशियामधून मोठ्या प्रमाणात खतांचीही आयात केली जाते. सध्या सोयाबीन दरवाढीदरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे खताच्या किंमतीच वाढणार नाहीत तर आयातीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.

दुष्काळात तेरावा : युध्दजन्य परस्थितीमुळे खतांचा तुटवडा भासणार? इतर पर्यायाच्या शोधात केंद्र सरकार
रशिया-युक्रेन युध्दामुळे भारतामध्ये होणाऱ्या खत आय़ातीवर परिणाम होणार आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 02, 2022 | 2:50 PM
Share

मुंबई : रशिया-युक्रेनच्या युध्दजन्य परस्थितीचा परिणाम आता शेती व्यवसयावर होऊ लागला आहे. केवळ (Sunflower Oil) सूर्यफूल तेलसाठ्यावरच याचा परिणाम होणार असे नाही तर भारतामध्ये रशियामधून मोठ्या प्रमाणात खतांचीही आयात केली जाते. सध्या सोयाबीन दरवाढीदरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे (Fertilizer Rate) खताच्या किंमतीच वाढणार नाहीत तर आयातीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असल्याचे संकेत (Central Government) केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता खरीप हंमासाठी खताचा तुटवडा भासू नये म्हणून इतर पर्यांयांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. 12 टक्के खत एकट्या रशियामधून आयात केले जाते. त्यानुसार दरवर्षी 70 लाख टन डीएपीची आयात होते. पोटॅश 50 लाख टन आयात केले जाते. त्यामुळे भविष्यात खताचे दर वाढून देखील मागणी तेवढा पूरवठा होतो की नाही याबाबत साशंका उपस्थित होत आहे.

गत महिन्यातच केले होते करार

खत निर्मितीसाठी कच्च्या मालाचा पूरवठा होत नसल्याने आगामी काळात खतांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच भारताने रशियाबरोबर खत आयातीसाठीचे करार केले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्येच युध्दजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार दरवर्षी डीएपी आणि पोटॅश प्रत्येकी 10 लाख टन आणि एनपीके 8 लाख टन खातांची आयात करणार हे स्पष्ट करण्यात आले होते. परंतू सध्याच्या वातावरणामुळे खतांचा पूरवठा विस्कळीत होऊ लागला आहे. ही परस्थिती लवकर निवळली नाही तर सध्याच्या दरापेक्षा अधिकचे दर होतील असे सूचक विधान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

इतर पर्यायाचा शोध पण अडचणी कायम

रशिया आणि युक्रेन मध्ये युध्द सुरु झाल्यानंतर लागलीच इतर पर्यांयांचा शोध हा सुरु झाला आहे. पण रशियासारखा शाश्वत खत पूरवठा होईल की नाही याबाबत साशंका आहे. असे असतानाही भारतीय कंपन्या ह्या जॉर्डन, मोरोक्को आणि कॅनडा या देशांकडून पूरवठा होऊ शकतो का याची चाचपणी करीत आहे. या सर्व परस्थितीमध्ये आगोदरच खताच्या दरात वाढ झाली आहे. असे असतानाच आयातच झाली नाही तर मात्र, दरही वाढतील अन् पूरवठा होणार की नाही हे देखील ठामपणे सांगता येणार नाही अशी सध्याची स्थिती झाली आहे.

खत अनुदानासाठी 1 लाख कोटींची तरतूद

भारत देशाने खत अनुदानासाठी 1 लाख कोटींची तरतूद केली आहे. असे असताना भविष्यात दरवाढ झाली तरी अनुदानाचा आकडाही वाढणार आहे. फॉस्फेट खताची निर्मिती ही भारतामध्ये होत नाही. त्यामुळे सर्वकाही आयातीवरच अवलंबून आहे .त्यामुळे दरात वाढ झाली किंवा पैसे अदा करण्यास अडचणी निर्माण झाल्या तर याचा थेट परिणाम हा खताच्या पूरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे एकीकडे या परस्थितीमुळे सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे तर दुसरीकडे खताच्या दरातही वाढ निश्चित मानली जात आहे. याबाबत खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी चिंता व्यक्त केली आहे. केवळ आयातीवर नाही तर निर्यातीवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे दुहेरी संकटाचा सामना करताना थेट शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

Photo: हौसेला नाही मोल..! गायीच्या डोहाळे जेवणात गावाचा सहभाग, संस्कृतीचे जतन अन् वेगळेपणही

ठरलं तर मग, व्यापारी अन् शेतकऱ्यांच्या बैठकीत पपई दराचा निर्णय, टिकणार की मोडणार..!

विलासराव देशमुख अभय योजनेमुळे थकबाकीदार वीज ग्राहकांना मिळणार ‘उर्जा’, नेमका फायदा काय?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...