Mango : उन्हाळ्यात नव्हे तर पावसाळ्याच्या तोंडावर चाखा आता केसरची चव, कशामुळे ओढावली परस्थिती?

| Updated on: Feb 27, 2022 | 9:40 AM

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा सर्वकाही अवेळी ठरत आहे. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात तर घट झालीच आहे पण सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झाला आहे. यापूर्वी कोकणातील हापूस आंब्याचेही उशिराने आगमन झाले होते तर आता तीच परस्थिती मराठवाड्यातील केसर आंब्यावर ओढावली आहे.आता कुठे आंबे मोहर लागला आहे.

Mango : उन्हाळ्यात नव्हे तर पावसाळ्याच्या तोंडावर चाखा आता केसरची चव, कशामुळे ओढावली परस्थिती?
अवकाळीनंतर आता वाढत्या उन्हामुळे आबा गळतीचा धोका निर्माण झाला आहे.
Follow us on

औरंगाबाद : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा सर्वकाही अवेळी ठरत आहे. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात तर घट झालीच आहे पण सर्वाधिक परिणाम हा (Orchard) फळबागांवर झाला आहे. यापूर्वी कोकणातील हापूस (Mango) आंब्याचेही उशिराने आगमन झाले होते तर आता तीच परस्थिती (Marathwada) मराठवाड्यातील केसर आंब्यावर ओढावली आहे.आता कुठे आंबे मोहर लागला आहे. काही भागात तंत्रज्ञान आणि योग्य व्यवस्थापनामुळे 30 ते 40 केसर हे मे अखेरीस बाजारात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे उर्वरीत भागातील 60 टक्के आंबा खाण्यायोग्य होण्यासाठी मे अखेरीस किंवा जूनही उडाडू शकतो. त्यामुळे मध्यंतरीच्या वातावरणामुळे हा बदल झाला असून त्याचा परिणाम फळवाढीवर दिसून येत आहे. मराठवाड्यात 20 हजार हेक्टरावर केसरची लागवड आहे. योग्य व्यवस्थापन आणि अधिकचा खर्च करुनही हे फळ वेळेत शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही.

लांबलेल्या हंगामाचा काय परिणाम?

आंबा फळबागांच्याबाबतीत सर्वकाही महिन्याभराच्या उशिराने प्रक्रिया होत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या तोंडावर बाजारात येणाऱ्या केसरला यंदा जून उजाडणार आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार नसला तरी आंबा खवय्यांना महिनाभराची प्रतिक्षा तर करावीच लागणार आहे. शिवाय दरम्यानच्या काळात जर अधिकचे ऊन पडले तर गळ होण्याचा धोका आहे. त्यामुळे सुरवातीला पावसाचा आणि अंतिम टप्प्यात कडाक्याच्या ऊनाचा परिणाम होऊ शकतो.

चार टप्प्यात केसरचे उत्पादन

दरवर्षी मे महिन्यामध्ये जवळपास 70 ते 80 टक्के केसर आंब्याची विक्री होत असते. यंदा मात्र, बदलत्या वातावरणामुळे चार टप्प्यात केसरचे फळ शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. 15 मे महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यातील आणि त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात उर्वरीत फळ शेतकऱ्यांना मिळेल असा आशावाद आहे. प्रतिकूल वातावरणामुळे आंब्याची वेळेत सेटींग झालेली नाही. त्यामुळे ही परस्थिती ओढावली असल्याचे आंबा तज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी सांगितले आहे.

यामुळे लांबला हंगाम

ज्या अवस्थेत आंब्याला मोहर लागण्याचा कालावधी होता त्या दरम्यान, पावसामुळे आंब्याची झाडे ही सुप्तअवस्थेत होती. शेतजमिनीमध्ये वाफसा नव्हता तर आंब्याच्या मुळांना हवा मिळाली नाही. परिणामी झाडांना अन्नद्रव्ये मिळाली नाहीत. असेच प्रतिकूल वातावरण पुढे कायम राहिल्याने भुरीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये मोहर लागण्यास सुरवात झाल्याने यंदा हंगाम लांबणीवर आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये केसर आंब्याचे क्षेत्र आहे.

संबंधित बातम्या :

ऊसतोडणी धिम्या गतीने तरीही साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच घोडदौड कायम..! कारखान्यांवर दबाव कशाचा?

PM Kisan : 48 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही 10 हप्ता, योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग ‘ही’ प्रक्रिया कराच..!

Banana : केळी निर्यात लांबणीवर, आता दरावर काय होणार परिणाम?