PM Kisan : 48 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही 10 हप्ता, योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग ‘ही’ प्रक्रिया कराच..!

अत्यंल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 वा हप्ता जमा होऊन दोन महिने होत आहेत. असे असतानाही देशातील तब्बल 48 लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. 10 हप्ता हा 1 जानेवारी रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. पण चूकीची माहिती, खाते क्रमांकमध्ये गडबड अशा अनेक कारणांमुळे लाखो शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही.

PM Kisan : 48 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही 10 हप्ता, योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग 'ही' प्रक्रिया कराच..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 5:02 AM

मुंबई : अत्यंल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 वा हप्ता जमा होऊन दोन महिने होत आहेत. असे असतानाही देशातील तब्बल 48 लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. 10 हप्ता हा 1 जानेवारी रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. पण चूकीची माहिती, खाते क्रमांकमध्ये गडबड अशा अनेक कारणांमुळे लाखो शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही. यातच आता 11 व्या हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना EKYC हे पूर्ण करुन घ्यावे लागणार आहे. तरच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ही प्रक्रिया 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण करावी लागणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत एकूण 12 कोटी 49 लाख शेतकऱ्यांची नोंदणी आहे. 10 व्या हप्त्यासाठी एकूण 10 कोटी 71 लाख कोटी शेतकऱ्यांचा एफटीओ तयार झाला होता आणि पहिल्या हप्त्याचे पैसे 10 कोटी 22 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.

11 व्या हप्त्यासाठी E-KYC बंधनकारकच, अशी आहे प्रक्रिया

  1. पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये अनियमितता होत असल्याने आता 11 हप्त्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करुन घ्यावे लागणार आहे. त्यामुळे e-KYC म्हणजे electronic know your custumer एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहणे म्हणजेच ई केवायसी आता eKYC करायची असेल तर www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.वेबसाइट ओपन झाल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला लाल अक्षरांमध्ये एक सूचना दिसेल ती अशी की eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres याचा अर्थ तुम्ही तर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.
  2. *आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे
  3. *आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.

अकरावा हप्ता कधी येणार?

आतापर्यंत पीएम किसानचे 10 हप्ते जारी करण्यात आले आहेत. मार्चनंतरच शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात केंद्र सरकारने हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. यावेळी एप्रिल किंवा मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील, अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या :

Success Story :  शेती व्यवसयात आयुर्वेदिक औषध कंपनीची मदत, करार शेतीतून चित्रंच पालटले..!

यंदाचं काय घेऊन बसलावं, 4 वर्षापूर्वीच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत गंगाखेडचे शेतकरी, आता उपोषणाचे अस्त्र

Soybean Rate : आता उलटी गिनती सुरु..! आठ दिवसांमध्ये घडले अन् एका रात्रीतून बिघडले

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.