E-NAM: ई-नाम प्लॅटफॉर्मची पाच वर्ष, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांची मोठी घोषणा

राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच ई-नाम प्लॅटफॉर्मला 5 वर्षे पूर्ण होतं आहेत. e-Nam scheme

E-NAM: ई-नाम प्लॅटफॉर्मची पाच वर्ष, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 11:10 AM

नवी दिल्ली: राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच ई-नाम प्लॅटफॉर्मला 5 वर्षे पूर्ण होतं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2016 ला ई-नामची सुरुवात केली होती. केंद्र सरकारनं आतापर्यंत 585 बाजारसमित्या ई-नामशी जोडल्या आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यानिमित्त ई-नाम पोर्टलचा विस्तार करणार असल्याची माहिती दिली आहे. ई-नाम प्लॅटफॉर्मचा फायदा शेतकऱ्यांचं  उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये उपयोगी ठरेल, असं तोमर म्हणाले. (What is e-Nam scheme How do you use and register )

2021 मध्ये ई-नामचा विस्तार करणार

नरेंद्र सिंह तोमर यांनी ई-नाम योजनेचा विस्तार करणार असल्याची माहिती दिली. ई-नाम योजना लक्षू शेतकरी कृषी व्यापार संघ यांच्याकडून राबवली जाते. सरकार ई-नाम योजना 200 बाजार समित्यांमध्ये लागू करणार आहे. तर, पुढील वर्षी 215 बाजार समित्या ई-नामशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. भारतात एकूण 2700 कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. तर, 4000 उपबाजार आहेत.

ई-नाम म्हणजे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांची ही सर्वात मोठी व्यथा समजून घेतली आणि पिकाच्या ऑनलाईन विक्रीसाठी देशभरात कृषी बाजार समित्या (ई-मंडी) उघडला. इंटरनेटच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांत असलेल्या कृषी उपज बाजार समितीच्या नावाखाली देशांतील 585 बाजार समित्या जोडल्या गेल्यात. संपूर्ण देश हा बाजारपेठ बनला पाहिजे, असे त्याचे लक्ष्य आहे.

बिहारमधील एखाद्या शेतकऱ्याला आपले उत्पादन दिल्लीत विकायचे असेल तर शेतीमाल घेऊन जाणे आणि त्यांची विक्री करणे या ई-नाम योजनेमुळे सोपे झाले. याअंतर्गत शेतकरी कुठल्याही वस्तू चांगल्या किमतीवर नोंदणी करून विक्री करू शकतात. शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामधील दलालाची मध्यस्थी ई-नामाने संपुष्टात आणलीय. केवळ शेतकरीच नाही तर ग्राहकांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील या व्यापारात स्थानिक कृषी उत्पन्न बाजारपेठेच्या हिताचे नुकसान होणार नाही.

ई-नामवर नव्या सुविधा कोणत्या

शेतमाल विक्रीसोबत शेतकऱ्यांना ई-नाम पोर्टलवर हवामानाची माहिती मिळणार आहे. हवामानाची माहिती मिळाल्यानं शेतकऱ्यांना पिकांची कापणी कधी करावी, याचा अंदाज येणार आहे. ई-नाम पोर्टलवर आतापर्यंत 1.70 कोटी शेतकरी आणि 1.63 लाख व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे.

नोंदणी कशी करावी?

सर्वप्रथम आपल्याला सरकारने जारी केलेल्या वेबसाईट www.enam.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर ही नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल. तेथे एक शेतकरी पर्याय दिसेल. मग आपल्याला आपला ईमेल आयडी द्यावा लागेल. यात आपल्याला ईमेलद्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. यानंतर आपणास ई-मेल आयडी आणि पासवर्ड पाठविला जाईल. आपण आपल्या केवायसी कागदपत्रांद्वारे www.enam.gov.in या वेबसाईटवर अर्ज करून आपल्या डॅशबोर्डवर नोंदणी करू शकता.

संबंधित बातम्या:

एका एकरात दोन लाख रुपयांची कमाई, गवती चहा शेतीतून शेतकऱ्यांना नवी संधी, वाचा सविस्तर

पाऊस, वादळ वाऱ्याचा अंदाज शेतकऱ्यांना सांगणारं मेघदूत ॲप नेमकं काय?

(What is e-Nam scheme How do you use and register  )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.