जगातील सर्वात छोटी गाय, लांबी फक्त दोन फुट, भारतातील या गायीचं दूधही उच्च प्रतीचं

केरळमधील कोझीकोड येथील अंथोली गावातील बालकृष्णन यांच्याकडे ही गाय आहे. World shortest cow in India

जगातील सर्वात छोटी गाय, लांबी फक्त दोन फुट, भारतातील या गायीचं दूधही उच्च प्रतीचं
मानिक्यम गाय
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 5:27 PM

तिरुअनंतरपुरम: केरळमधील एका गायीचा समावेश गिनीज वर्ल्ड  रेकॉर्डमध्ये झाला आहे. एका गायीचा गिनीज रेकॉर्डमध्ये समावेश होतो, यामागे असं काय वेगळेपण आहे. तर, ही गाय उंची आणि लांबीच्या दृष्टीनं छोटी आहे. या गायीचं नाव मानिक्यम आहे. केरळमधील कोझीकोड येथील अंथोली गावातील बालकृष्णन यांच्याकडे ही गाय आहे. (World shortest cow in India Manikyam owned by Ashkay NV India in Kerala Manikyam Know full details)

6 वर्ष वय 2 फुट लांबी

मानिक्यम गायीचं वय 6 वर्ष आहे, तर तिची लांबी 61.5 सेमी आहे. पर्यावरणवादील आणि शेतकरी एनवी बालकृष्णन या गायीचं पालन करतात. बालकृष्णन यांनी या गायीची लांबी 2 फुटांपेक्षा जास्त वाढू शकली नाही, असं सांगितलं. ते या गायीला पाच वर्षांपूर्वी घरी घेऊन आले होते. बालकृष्णन मानिक्यम गायीला त्यांच्या घरातील एका सदस्याप्रमाणं पाळतात.

पशुसंवर्धन अधिकारी काय म्हणतात?

डॉ. प्रिया नायर या पशुसंवर्धन अधिकारी म्हणून काम करतात. त्यांनी अशा प्रकारची गाय यापूर्वी पाहिली नसल्याचं सांगितलं. मानिक्यम ही जगातील असामान्य गाय असल्याचं म्हटलं आहे. एनवी बालकृष्णन यांचा मुलगा अक्षय नमबुकुडी यानं मानिक्यम गाय सेलिब्रेटी झाल्याचं म्हटलं आहे. लोक त्या गायीसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करतात.

केरळमधील वेचुरमध्ये आढळली

मानिक्यम गाय केरळमधील वेचुरमध्ये आढळली होती. वेचुर हा भाग कोट्टायम परिसरात येतो. मानिक्यम गाय वेचुर प्रजातीची असल्याचं बोललं जात आहे.

वेचुर प्रजातीची गाय

केरळमधून वेचुर प्रजातीची गाय गायब झाली होती. क्रॉस ब्रीडिंगचं प्रमाण वाढल्यानं वेचुर गायींचं प्रमाण कमी झालं होतं. वेचुर गायीची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होती. मात्र, डॉ. सोसाम्मा यांनी केलेल्या कामाच्या जोरावर वेचुर गायींचं संवर्धन झालं. 1989 मध्ये त्यांनी सुरुवात केली होती.

संबंधित बातम्या:

PM Kisan : आठव्या हफ्त्याचे 2000 रुपये पाठविण्याची तयारी पूर्ण, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल ही रक्कम

पांढऱ्या अंडरवेअर जमिनीत गाढल्या, प्रत्येक घरात 2 अंडरवेअर पाठवल्या, भलत्या रिसर्चचं कारण काय?

(World shortest cow in India Manikyam owned by Ashkay NV India in Kerala Manikyam Know full details)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.