AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ducati ची 2021 Panigale V4 बाईक भारतात दाखल, कमी किंमतीत शानदार रायडिंग एक्सपीरियन्स

डुकाटी इंडियाने (Ducati India) सोमवारी भारतात 2021 Panigale V4 स्पोर्ट बाईक लाँच केली आहे.

Ducati ची 2021 Panigale V4 बाईक भारतात दाखल, कमी किंमतीत शानदार रायडिंग एक्सपीरियन्स
2021 Ducati Panigale V4
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 07, 2021 | 3:35 PM
Share

मुंबई : डुकाटी इंडियाने (Ducati India) सोमवारी भारतात 2021 Panigale V4 स्पोर्ट बाईक लाँच केली आहे. कंपनीने ही बाईक 23.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीसह बाजारात सादर केली आहे. Panigale V4 बाईक Panigale V2 पेक्षा अधिक दमदार आहे, जी कंपनीने 2020 मध्ये भारतात सादर केली होती. व्ही 4 ची किंमत 23.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि या बाईकच्या एस ट्रिमची किंमत 28.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. (2021 Ducati Panigale V4 launched in India at Rs 23.50 lakh price)

Panigale V4 ला मागील वर्षी एक जबरदस्त अपडेट मिळालं आहे. यामध्ये विंगलेट्स, एक रीट्यून्ड चेचिस आणि जबरदस्त परफॉर्मन्ससाठी सस्पेंशन सेटअप देण्यात आला होता. यासह ही बाईक राईड करणं अधिक सोपं झालं आहे. 2020 मॉडेल अधिकृतपणे भारतात सादर झाले नव्हते, तरी ग्राहकांच्या विशेष मागणीनुसार या मॉडेलचे काही युनिट्स भारतात विक्रीसाठी सादर केले होते.

डुकाटीच्या या नवीन फ्लॅगशिप स्पोर्ट्सबाईकमध्ये बीएस 6 कम्पलायंट 1,103 सीसी V4 Desmosedici Stradale इंजिन आहे, जे 13,000 आरपीएम वर 211 बीएचपी पॉवर आणि 9,500 आरपीएम वर 124 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह येतं.

PanigaleV4 चे फीचर्स

नवीन Panigale V4 बाईक लेटेस्ट-जनरेशन इलेक्ट्रॉनिक्स पॅकेजसह येते. जे 6 अॅक्सिस इनर्शियल प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. या बाईकच्या इलेक्ट्रॉनिक फीचर्समध्ये ABS कॉर्नरिंग EVO, DTC EVO 3, DSC, DWC EVO, DPL, DQS EVO 2, EBC EVO, DES EVO आणि नवीन रेडिंग मोड स्ट्रॅटजीचा समावेश आहे.

स्टँडर्ड आणि S दोन्ही ट्रिममध्ये समान इंजिन ट्यूनिंग आणि इलेक्ट्रॉनिक पॅकेज मिळते. तथापि, प्रीमियम-स्पेसिफिकेशनवालं एस ट्रिम इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड ओहलिंस सस्पेंशन, फॉर्ज्ड अॅल्यूमिनियम व्हील्स, एक लिथियम आयन बैटरी आणि कमी वजनासह (195 किलोग्राम) येते.

इतर बातम्या

पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी

अवघ्या 1200 रुपयात घरी न्या Bajaj ची शानदार बाईक, एक लीटर पेट्रोलमध्ये 90 किमी मायलेज

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

(2021 Ducati Panigale V4 launched in India at Rs 23.50 lakh price)

Follow Us
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....