शानदार Ducati XDiavel 2021 बाजारात, ट्रायम्फ रॉकेट 3R ला टक्कर

Multisrada V4 लाँच केल्यानंतर काही दिवसांनी, Ducati India आणखी एका सिरीज लाँच केली आहे.  दुचाकी उत्पादक कंपनीने आता 2021 XDiavel मोटारसायकल लाँच केली आहे.

शानदार Ducati XDiavel 2021 बाजारात, ट्रायम्फ रॉकेट 3R ला टक्कर
2021 Ducati XDiavel

मुंबई : Multisrada V4 लाँच केल्यानंतर काही दिवसांनी, Ducati India आणखी एका सिरीज लाँच केली आहे.  दुचाकी उत्पादक कंपनीने आता 2021 XDiavel मोटारसायकल लाँच केली आहे. डुकाटी कंपनीने ही बाईक दोन प्रकारात लॉन्च केली आहे. भारतीय ग्राहकांसाठी XDiavel श्रेणीतील डार्क आणि ब्लॅक स्टार आवृत्त्या आणण्याची शक्यता आहे. डुकाटी सध्या भारतीय बाजारात Diavel 1260 आणि Diavel 1260S ऑफर करते. (2021 Ducati XDiavel to be launched in India, check price and features)

डुकाटी इंडियाने आपल्या सोशल मीडियावर 2021 XDiavel बाईकच्या डार्क एडिशनबाबत टीझ केलं आहे. दुचाकी उत्पादक कंपनीने काही दिवसांपूर्वी 2021 डुकाटी XDiavel 1260 ब्लॅक स्टार एडिशनबाबत टीझ केलं होतं. मॉडेलचे बेस व्हेरियंट असलेल्या XDiavel Dark ला मॅट ब्लॅक फिनिश, ब्रेम्बो ब्रेक कॅलिपर, हेक्सागोनल LED हेडलॅम्प, उलटे U- आकाराचे LED DRLs, हँडलबारचा संच आणि 3.5-इंच TFT स्क्रीन आहे. याशिवाय यात, सिंगल-पीस सॅडल, दोन रायडिंग मोड, कॉर्नरिंग एबीएस, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आणि क्रूझ कंट्रोल देखील वाहनात दिले आहेत.

XDiavel 1260 Black Star मॉडेलचं टॉप-स्पेक व्हेरिएंट आहे. यात मशीन्ड एलॉय व्हील्स आहेत जे 2 किलो हलके आहेत. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह इंजिनवर एक Suede सीट कव्हर, एनोडाइज्ड फ्रेम प्लेट्स, मॅट ब्लॅक अॅल्युमिनियम बेल्ट कव्हर, बिलेट अॅल्युमिनियम रियरव्यू मिरर आणि ब्लॅक-आउट फिनिश मिळते.

डार्क आणि ब्लॅक स्टार एडिशन XDiavel दोन्ही 1262 ट्विन-सिलेंडर डीव्हीटी मोटरद्वारे समर्थित आहेत. जे इंजिन 158bhp आणि 127.4Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे.

इतर बातम्या

7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

प्रदूषण तपासणी केंद्र उघडले जाणार? चांगली कमाईची संधी अन् सरकार 3 लाख देणार

सिंगल चार्जवर 236 किमी रेंज, Simple Energy ची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, किंमत…

(2021 Ducati XDiavel to be launched in India, check price and features)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI