AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी किंमत, नवे दमदार फीचर्स, 2021 TVS Star City Plus चा टीझर लाँच

टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांची नवी मोटारसायकल टीव्हीएस स्टार सिटी प्लसचा (2021 TVS Star City Plus) एक टीझर जारी केला आहे.

कमी किंमत, नवे दमदार फीचर्स, 2021 TVS Star City Plus चा टीझर लाँच
2021 TVS Star City Plus
| Edited By: | Updated on: Feb 26, 2021 | 8:43 AM
Share

मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांची नवी मोटारसायकल टीव्हीएस स्टार सिटी प्लसचा (2021 TVS Star City Plus) एक नवीन टीझर जारी केला आहे. या क्षणी नवीन बाईकबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु ही बाईक नवीन कलर ऑप्शन किंवा संपूर्ण ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. या बाईकचं यापूर्वीचं व्हर्जन जानेवारी 2020 मध्ये लाँच करण्यात आलं होतं, ज्यामध्ये बीएस 6 इंजिन आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले होते. (2021 TVS Star City Plus Teased; To Be Launched Soon)

टीव्हीएस कंपनी यावेळी टीव्ही स्टार सिटी प्लसची खास आवृत्ती (स्पेशल एडिशन) बाजारात आणू शकते. या बाईकच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला LED हेडलॅम्प्स मिळतील जे स्टाईलिश सिल्व्हरच्या सराउंड्ससह असतील. यात तुम्हाला टीव्हीएस ब्रँडिंग, ब्लॅक मिरर, क्लियर लेन्स इंडिकेटर, लाँग सिंगल पीस सीट आणि ग्रॅब रेल मिळेल. जर आपण या बाईकच्या कलर ऑप्शनबद्दल बोललो तर ही बाईक टू टोन शेड्समध्ये येईल म्हणजेच ब्लॅक रेड, ब्लॅक ब्लू, ग्रे ब्लॅक, रेड ब्लॅक आणि व्हाइट ब्लॅक ऑप्शन्सह ही बाईक सादर केली जाऊ शकते.

टीव्हीएस स्टार सिटी प्लसमध्ये डिजिटल पार्ट अनालॉग कन्सोल, यूएसबी मोबाइल चार्जर, 5 स्टेप अॅडजस्टेबल शॉक अ‍ॅब्सॉर्बरसह अनेक स्मार्ट फीचर्स दिले जातील. ही बाईक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, ब्लॅक 5 स्पोक अलॉय व्हील्स आणि ड्रम ब्रेक्सचा सेट घेऊन येईल, ज्यामध्ये तुम्हाला 130 mm फ्रंट आणि 110 mm रियर ब्रेक मिळेल.

पॉवरट्रेनच्या बाबतीत टीव्हीएस स्टार सिटी प्लसला 109 सीसीचे बीएस 6 कम्पिलियंट इंजिन दिले जाईल जे फ्यूल इंजेक्टेड असेल. हे इंजिन 8.08 bhp वर 7350 rpm आणि 4500rpm वर 8.7 एनएमचा पीक टॉर्क देईल. इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्ससह येणार आहे, या मोटरसायकलचं टॉप स्पीड 90 किमी प्रतितास असेल. टीव्हीएस स्टार सिटीची किंमत सध्या 65,865 रुपये आहे.

इतर बातम्या

केवळ 51000 रुपयात घरी न्या 83KM मायलेज देणारी मोटारसायकल

(2021 TVS Star City Plus Teased; To Be Launched Soon)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.