AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2022 Hero Xtreme : भारतात लॉंच झाले 2022 हिरो एक्स्ट्रीम 160R चे नवे मॉडेल, किंमत आहे 1.17 लाख रुपये

हिरो मोटोकॉर्पने एक्स्ट्रीम 160R बाईकचे चे नवे मॉडेल लॉंच केले आहे. 2022 सालच्या मॉडेलमध्ये ग्राहकांना एक्सट्रीम 160Rच्या फीचर्समध्ये मोठे बदल झालेले पहायला मिळतील. मात्र एक्सट्रीम 160Rच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही बाईक 3 प्राइस रेंजमध्ये (किंमतीत) सादर करण्यात आली आहे.

2022 Hero Xtreme : भारतात लॉंच झाले 2022 हिरो एक्स्ट्रीम 160R चे नवे मॉडेल, किंमत आहे 1.17 लाख रुपये
भारतात लॉंच झाले 2022 हिरो एक्स्ट्रीम 160R चे नवे मॉडेल
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 9:36 PM
Share

देशातील प्रमुख बाईक निर्मात्यांपैकी एक असलेल्या हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) एक्सट्रीम 160R बाईकचे ( Hero Xtreme 160R) नवे मॉडेल लॉंच केले आहे. नव्या एक्स्ट्रीम 160R च्या फीचर्समध्ये ( new features) अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. सर्वात मोठा बदल एलसीडी पॅनेलमध्ये दिसून येईल. हिरो एक्सट्रीम 160Rमध्ये एलसीडी इन्स्ट्रुमेंट पॅनेलवर गिअर पोझिशन इंडिकेटरच्या रुपात अपग्रेड झाले आहे. त्यातच एलसीडी पॅनेलमध्ये स्पीडोमीटर, टेकोमीटर , ड्युएल ट्रीप मीटरसारखी बरीच माहिती मिळेल. एक्स्ट्रीमच्या या नव्या मॉडेलची किंमत 1.17 लाखांपासून सुरु होत आहे. बाजारात एक्सून ट्रीम 160Rची स्पर्धा बजाज पल्सर N160 आणि टीव्हीएस अपाचे 160 या दोघांशी होईल. जाणून घेऊया एक्स्ट्रीम 160R बाईकचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स…

काय आहेत 2022 हीरो एक्स्ट्रीम 160R चे स्पेसिफिकेशन्स ?

कंपनीने 160R, 2022 च्या इंजिनात कोणताही बदल केलेला नाही. 2022 हीरो एक्स्ट्रीम 160R मध्ये यापूर्वीच असलेले 163 ccचे इंजिन आहे. नव्या बाईकमध्ये ग्राहकांना 5 स्पीड ट्रान्स्मिशन मिळेल. मात्र, त्याची इंजिन पॉवर बजाज पल्सर N160 आणि टीव्हीस अपाचे 160 च्या तुलनेत कमी आहे. मात्र होंडा X ब्लेड च्या तुलनेत नव्या हिरो एक्स्ट्रीम 160R चे इंजिनची पॉवर थोडी जास्त आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्स्ट्रीम 160R चे वजन 138.5 किलोग्रॅम असून त्या सेगमेटमधील सर्वात हलकी बाईक आहे.

2022 हिरो एक्स्ट्रीम 160Rचे फीचर्स

हिरो एक्स्ट्रीम 160R मध्ये करण्यात आलेल्या बदलांमध्ये एलईडीचा (LED) मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. नव्या बाईकमध्ये एलईडी हॅंडलँप, एलईडी डीआरएल, एलईडी टर्न इंडिकेटर, स्कल्पटेड फ्युएल टँक आणि वेगळ्या टेल लँपसह ब्लॅक फिनिशिंग टेल सेक्शनही आहे. हिरो एक्स्ट्रीम 160R चेल इंजिन असेंबली, एक्झॉस्ट पाईप आणि ॲलॉय व्हील यांनाही काळा रंग व जास्ट स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. एक्स्ट्रॉ सेफ्टी फीचर्ससाठी तुम्ही 4,999 रुपयांमध्ये हिरो कनेक्ट कनेक्टिव्हिटी खरेदी करू शकता.

2022 हिरो एक्स्ट्रीम 160R ची किंमत किती ?

हिरो मोटोकॉर्पने 2022 एक्स्ट्रीम 160R ही बाईक बाजारात 3 प्राइस रेंजमध्ये ( किमतीत) सादर केली आहे. याच्या सिंगल डिस्क मॉडेलची एक्स- शोरूममधील किंमत 1.17 लाख रुपये आहे. तर डबल- डिस्क मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 1.20 लाख रुपयांपासून सुरू होते. एक्स्ट्रीम 160R स्टील्थ एडिशनची सुरुवातीची एक्स- शोरुम किंमत 1.23 लाख रुपये इतकी आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....