Akola Temple : अकोल्यात चोरांनी केले मंदिर टार्गेट, रातोरात दोन मंदिरे फोडली, चोर सीसीटीव्हीत कैद

चोर कुठं चोरी करतील काही सांगता येत नाही. चोर आता मंदिरांनाही सोडत नाहीत. अकोल्यात एकाच दिवशी दोन मंदिरात चोरी करून चोरांनी खळबळ उडवून दिली.

Akola Temple : अकोल्यात चोरांनी केले मंदिर टार्गेट, रातोरात दोन मंदिरे फोडली, चोर सीसीटीव्हीत कैद
रातोरात दोन मंदिरे फोडलीImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 9:16 PM

अकोला : अकोल्यात चोरांनी मंदिर टार्गेट केले. रातोरात दोन मंदिरे फोडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. महाकाली मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडले, तर शिव मंदिरातील दानपेटीच चोर सोबत घेऊन गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. अकोल्यात आज सकाळी चोरीची (Chori) घटना उघडकीस आली. यात दोन मंदिरात चोरी झाली, तर शहरातील मोठी परिसरातील असलेल्या शिव मंदिर (Shiva Temple) अन् महाकाली मंदिरात (Mahakali Temple) चोरट्यांनी चोरी केली आहे. या दोन्ही मंदिरातील दानपेटी फोडली. लोकांनी दान केलेले काही पैसे जमा झाले होते. आता हे पैसे चोरट्याने लंपास केले आहे. याची माहिती सिव्हिल पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा केला. आता चोरटे महाकाली मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. गेल्या आठ दिवसात चोरट्यांचा अकोल्यात तिसऱ्यांदा चोरीचा धुमाकूळ पाहायला मिळाला.

मंदिरातील दानपेट्याही नाहीत सुरक्षित

चोर कुठं चोरी करतील काही सांगता येत नाही. चोर आता मंदिरांनाही सोडत नाहीत. अकोल्यात एकाच दिवशी दोन मंदिरात चोरी करून चोरांनी खळबळ उडवून दिली. शिव मंदिर आणि महाकाली मंदिरात चोरट्यांनी चोरी केली. यावेळी हे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. एक चोर चोरी करताना दिसतो. त्याने कुलूप फोडलेले आहे. कुलूप फोडल्यानंतर दानपेटीतील चोरी केली. त्यानंतर कुलूप फेकून दिला. या घटनेनं मंदिरही सुरक्षित राहिले नसल्याचं दिसून येतं. मंदिरातील देवही आता सुरक्षित राहिलेले नाहीत. मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारला जात आहे. अशावेळी पोलिसांसमोर या चोरट्यांना अटक करण्याचं मोठं आव्हान आहे. चेहरा झाकून ठेवल्यामुळं चोरांचा पत्ता लावणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

आठवड्याभरात तिसरी चोरी

अकोला शहरात चोरीचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसात चोरट्यांचा अकोल्यात तिसऱ्यांदा चोरी केली. यामुळं चोरांवर अंकूश कसा लावता येईल, याचा विचार पोलिसांना करावा लागणार आहे. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.