AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा वेटिंग पिरियड, तरिही डिसेंबरमध्ये Thar च्या 6500 युनिट्सचं बुकिंग; या कारमध्ये काय आहे खास?

महिंद्रा अँड महिंद्राने दोन महिन्यांपूर्वी लाँच केलेली Mahindra THAR 2020 ही एसयूव्ही भारतीयांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मोठा वेटिंग पिरियड, तरिही डिसेंबरमध्ये Thar च्या 6500 युनिट्सचं बुकिंग; या कारमध्ये काय आहे खास?
| Updated on: Jan 03, 2021 | 8:50 AM
Share

मुंबई : भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी त्यांची लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा ‘THAR 2020’ भारतात लाँच केली होती. या ‘सेकंड जनरेशन महिंद्रा THAR 2020’ ची किंमत 9.8 लाख रुपयांपासून सुरु होते. तर महिंद्रा थारचे एलएक्स ट्रिम हे टॉप मॉडेल 13 लाख रुपयांपर्यंत बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या कारची जोरदार विक्री होत आहेच, सोबतच या कारसाठी मोठा वेटिंग पिरियडही आहे. तरीदेखील डिसेंबरमध्ये या कारच्या 6500 युनिट्ससाठी बुकिंग्स मिळाल्या आहेत. (6500 Units of Mahindra Thar 2020 booked in December even after Long waiting period)

महिंद्राच्या या सेकेंड जनरेशन थारसाठी (Mahindra Thar 2020) लाँचिंगपूर्वीच 9000 बुकिंग्स आल्या होत्या. दरम्यान, ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर महिंद्रा थारला सुरक्षिततेच्या बाबतीत 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. ग्लोबल NCAP ‘सेफ कार फॉर इंडिया’ क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग दिलं आहे तसेच मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही या कारला 4 स्टार्स मिळाले आहेत. क्रॅश टेस्ट रिपोर्ट पाहिल्यानंतर या कारला ग्राहकांकडून अधिक पसंती, मिळू लागल्याचे बोलले जात आहे.

सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’ची वैशिष्ट्ये

जुन्या महिंद्रा थारच्या तुलनेत नवीन महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये बऱ्यापैकी कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह नवी महिंद्रा ‘THAR 2020’ खरेदी करू शकतात. या नव्या ‘THAR 2020’मध्ये 4 सीट आणि 6 सीट, असे सीटिंग लेआउट पर्याय देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.0 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन, 150 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. तर, 2.2 लीटर डिझेल इंजिनने 130 बीएचपीची पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट केले जाते. या नव्या ‘THAR 2020’मध्ये बीएस 6 इंजिन देण्यात आले असून, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारच्या उर्वरित वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 9 वेरियंटसह रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, मिस्टिक कॉपर, रॉकी बेज, नेपोली ब्लॅक आणि अ‍ॅक्वामरीन या वेगवेगळ्या रंगात ‘THAR 2020’ लाँच केली गेली आहे.

महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, अ‍ॅडजेस्टेबल सीट, रूफ माउंट स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, हिल कंट्रोल, डिजिटल ओडोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, असे फीचर्स देण्यात आले आहेत. महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये खास चौकोनी एलईडी टेललाईट्स, स्पोक अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Mahindra Thar 2020 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल

Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ, तरीही कंपनी कार बंद करण्याच्या विचारात?

Mahindra THAR चा जलवा कायम, दिवाळीच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक विक्री

क्रॅश टेस्टमध्ये Mahindra THAR पास की नापास?

(6500 Units of Mahindra Thar 2020 booked in December even after Long waiting period)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.