AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

flying car : कारमधून आकाशात करा प्रवास; फ्लाईंग कार खरेदीसाठी हजारो लोकांची उसळली गर्दी, या कंपनीने करून दाखवले

आता ट्रॅफिक जाममध्ये फसण्याची झंझट राहणार नाही. उडणारी कार आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे ही कार बाजारात येण्यापूर्वीच तिचे प्री-बुकिंगही सुरू झाले आहे. मग तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी तयार आहात ना?

flying car : कारमधून आकाशात करा प्रवास; फ्लाईंग कार खरेदीसाठी हजारो लोकांची उसळली गर्दी, या कंपनीने करून दाखवले
| Updated on: Aug 31, 2025 | 4:18 PM
Share

Alef flying Car : जगातील पहिली उडणारी कार आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या कारचे नाव नाव एलेफ एअरोनॉटिक्स असे आहे. ही कार विमानपेक्षा पण जलद आणि सुरक्षित उड्डाण करत असल्याचा दावा आहे. ही कार प्रवाशांना त्यांच्या गंतव्य, इच्छित स्थळी पोहचवू शकते. ही कार दिसायला एखाद्या सामान्य कारप्रमाणेच दिसते. पण या कारचे वैशिष्ट्य जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचे एकामागून एक धक्के बसतील. एलेफ एयरोनॉटिक्स एक अमेरिकन कंपनी आहे. ही कंपनी ऑटोमोटिव्ह आणि विमान यांचे हायब्रीड तयार करण्यासाठी अनेक दिवसांपासून काम करत होती. कार लवकरच लाँच होईल. त्यापूर्वीच तिचे बुकींग सुरू झाले आहे.

एलेफ एअरोनॉटिक्सने हाफ मून बे विमान तळ (HAF) आणि हॉलिस्टर विमानतळावर (CVH) या कारचे उड्डाण आणि उतरण्यासाठीचा करार पण केला आहे. या कंपनीने या कारच्या अनेक चाचण्या घेतल्या आहेत. ही कंपनी कार आणि विमान या दोन्ही रुपात कारची कामगिरी लवकरच जगासमोर आणेल. ही दळणवळण क्षेत्रात क्रांती मानल्या जात आहे. काही दिवसातच जगभरात ही कंपनी फ्लाईंग कारसाठी छोटे-छोटे विमानतळ तयार करेल अथवा जे विमानतळ उपयोगात नाही, ते भाडेतत्त्वावर चालवायला घेण्याची शक्यता आहे.

Alef flying Car ची वैशिष्ट्ये काय?

Alef Model A ही एक इलेक्ट्रिक उडणारी कार आहे. ती जमिनीवर 200 मैल तर हवेत 110 मैलाचा टप्पा पार करू शकते. या कारमध्ये आठ इलेक्ट्रिक मोटर आणि प्रोपेलर आहे. त्यामुळे ही कार हवेत झटपट झेपावेल. रस्त्यांवर ही कार मंदगतीने जवळपास ताशी 25-35 मैलाने धावेल. ही एक कमी गतीची उडणारी चारचाकी आहे. यामध्ये हवेत उडण्यासाठी एक प्रकारची खास तंत्रज्ञान बसवण्यात आले. हे तंत्रज्ञान विमानाच्या तंत्रज्ञानाशी मिळते जुळते आहे. कार्बन फायबरपासून ही कार तयार करण्यात आली आहे. त्यामुळे तिचे वजन हे सर्वसामान्य कारपेक्षा ही हलके आहे. ही कार आरामशीर हवेत झेपावू शकते. या कारमध्ये अनेक खास सुरक्षा उपाय आहेत. कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर उतरण्यासाठी आपत्कालीन बॅलिस्टिक पॅराशूटचा पण यामध्ये वापर करता येईल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.