AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honda ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँचिंगसाठी सज्ज, सिंगल चार्जवर 87Km ची रेंज

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया कंपनीद इलेक्ट्रिक स्कूटर (Honda Benly E electric scooter) लाँच करण्याची योजना आखत आहे.

Honda ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँचिंगसाठी सज्ज, सिंगल चार्जवर 87Km ची रेंज
Honda Benly E
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 3:56 PM
Share

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Honda Sports EV Concept Car S660s in under production, launch Soon)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया कंपनीदेखील इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची योजना आखत आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, कंपनी PCX इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर करु शकते.

होंडा इलेक्ट्रिक टू व्हिलर स्कूटरच्या यादीमध्ये आता आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव समाविष्ट केले गेले आहे. होंडा बेन्ली ई (Honda Benly E) असे या स्कूटरचे नाव असून नुकतीच ही स्कूटर टेस्टींगदरम्यान पाहायला मिळाली आहे. तथापि, कंपनीकडून नव्हे तर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (ARAI) या स्कूटरचं टेस्टिंग सुरु होतं.

या स्कूटरच्या डिझाइनमध्ये फ्रंट अप्रॉनवर बास्केट, मागील बाजूस फ्लॅट लोडिंग डेक, 60 किलो पेलोड क्षमता इत्यादींचा समावेश आहे. जर आपण या स्कूटरच्या वैशिष्ट्यांविषयी बोललो तर त्यामध्ये एलईडी लाईट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि चार्जिंग सॉकेट इत्यादी फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

Honda Benly e चे स्पेसिफिकेशन्स

Honda Benly e मध्ये दोन मोटर्स देण्यात आल्या आहेत. ज्यापैकी एक 2.8kW इलेक्ट्रिक मोटर आणि दुसरी याहून अधिक पॉवरफुल 4.2 kW इलेक्ट्रिक मोटर आहे. या स्कूटरमधील बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 48V क्षमतेच्या दोन स्वॅपेबल बॅटरी देण्यात आल्या आहेत.

पहिल्या मोटरचा वापर केल्यास Honda Benly e सिंगल चार्जवर 87 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. परंतु या मोटरसह ही स्कूटर जास्तीत जास्त 30 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. तर दुसऱ्या मोटरद्वारे ही स्कूटर ताशी 60 किलोमीटर इतक्या वेगाने धावेल. परंतु या मोटरसह ही स्कूटर केवळ 47 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल.

होंडा मोटर्स आणि स्कूटर इंडियाने या स्कूटरच्या लाँचिंगबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, ARAI च्या चाचणीतून असे अनुमान काढले जाऊ शकते की, ही स्कूटर लवकरच भारतात लाँच केली जाऊ शकते.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक कार-बाईक खरेदीवरील खर्च कमी होणार, नव्या सुविधा मिळणार, सरकारचा नवा नियम

सिंगल चार्जवर 95Km रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती

सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.