AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 वर्षांखालील मुलांना इलेक्ट्रिक कार चालवायला परवानगी आहे का? जाणून घ्या!

रस्त्यावर इलेक्ट्रिक गाड्या वाढतायत आणि त्या पाहून अनेकांच्या मनात प्रश्न येतो की 'अरे, या गाड्या चालवायला लायसन्स लागतं का? आपली लहान मुलं चालवू शकतात का?' हा गैरसमज तुमच्याही मनात आहे का? वाटतंय का की १८ वर्षांखालची मुलं इलेक्ट्रिक कार चालवू शकतील? थांबा! कायदा काय म्हणतो हे जाणून न घेता तुमच्या मुलाच्या हातात इलेक्ट्रिक गाडीची चावी देणं खूप महागात पडू शकतं. चला, नियम काय आहेत ते स्पष्टपणे समजून घेऊया!

18 वर्षांखालील मुलांना इलेक्ट्रिक कार चालवायला परवानगी आहे का?  जाणून घ्या!
इलेक्ट्रिक कार
| Edited By: | Updated on: Apr 29, 2025 | 3:20 PM
Share

सध्या शहरांपासून गावांपर्यंत रस्त्यांवर इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. महागड्या पेट्रोल-डिझेलपासून बचत आणि पर्यावरणपूरक प्रवास यामुळे बरेच लोक इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्सकडे आकर्षित होत आहेत. पण यासोबत एक महत्त्वाचा प्रश्न पालक आणि तरुणांच्या मनात येतो, “१८ वर्षांखालील मुलं इलेक्ट्रिक कार चालवू शकतात का?”

कायदा काय सांगतो?

भारतात वाहन चालवण्यासंबंधी नियम Motor Vehicles Act, 1988 अंतर्गत ठरवले जातात. या कायद्यानुसार, कोणतीही चारचाकी गाडी चालवण्यासाठी चालकाचं वय किमान १८ वर्ष पूर्ण असणं आणि त्याच्याकडे वैध Driving License असणं गरजेचं आहे. गाडी इलेक्ट्रिक असो की पेट्रोल-डिझेलवर चालणारी, सर्वांसाठी नियम एकच लागू होतो.

१६ वर्षांनंतर कोणती गाडी चालवता येते?

१६ ते १८ वयोगटातील मुलांना केवळ विशिष्ट प्रकारच्या कमी पॉवरच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Scooter) चालवण्याची परवानगी आहे. परंतू, या सवलतीच्याही काही अटी आहेत:

1. स्कूटर गिअरलेस असावी.

2. तिची मोटर शक्ती १५०० वॉट्स पेक्षा कमी असावी.

3. स्कूटरचा वेग मर्यादित असावा.

या गाड्यांना Registration किंवा मोठ्या लायसन्सची गरज नसते, पण तरीही यासाठी ‘LL’ — Learning License आवश्यक आहे. त्यामुळे कार असो, बाईक असो, पॉवर जास्त असेल तर कायद्यात कोणतीही माफी नाही!

अल्पवयीन मुलगा गाडी चालवताना पकडल्यास काय होते?

जर एखाद्या १८ वर्षाखालील मुलाने कार, बाईक किंवा परवानगी नसलेली इलेक्ट्रिक गाडी चालवताना पकडले गेले, तर पालकांसाठी आणि गाडी मालकांसाठी ही मोठी अडचण ठरू शकते.

कायदेशीर कारवाई दंड काय असतो:

1. ₹२५,०००/- दंड भरावा लागतो.

2. गाडीची नोंदणी १ वर्षासाठी रद्द केली जाते.

3. अपघात झाला तर पालकांवरही केस दाखल होऊन ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

वय कायद्यानुसार ठरलेलं आहे आणि कोणतीही इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठी किमान १८ वर्ष पूर्ण वय आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. गैरसमजात न राहता कायद्याची योग्य माहिती असणे फायद्याचे ठरेल!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...