AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 लाख रुपयांच्या कार लोनवर मासिक EMI किती? जाणून घ्या

कार लोन घेण्यासाठी तुम्ही अ‍ॅक्सिस बँकेकडून कर्ज घेऊ शकता. अ‍ॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराने कार लोन देते. जाणून घेऊया अ‍ॅक्सिस बँकेच्या कार लोनच्या डिटेल्सबद्दल.

7 लाख रुपयांच्या कार लोनवर मासिक EMI किती? जाणून घ्या
कार लोन
| Edited By: | Updated on: Apr 15, 2025 | 4:26 PM
Share

स्वत:ची कार विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. प्रत्येकाला स्वत:ची गाडी हवी असते, पण सामान्य माणसासाठी कार विकत घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. कार खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांची गरज आहे. सर्वसामान्यांना कार खरेदी करणे खूप अवघड होऊन बसते. अशावेळी अनेकजण बँकेकडून कार लोन घेऊन कार खरेदीही करतात. मात्र, कर्जात तुम्हाला व्याज म्हणून मोठी रक्कम भरावी लागते, पण तुम्ही दरमहा EMI च्या माध्यमातून त्याची परतफेड करता.

देशातील विविध बँकांकडून वेगवेगळ्या व्याजदराने कार लोन दिले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही कार लोन घेऊन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशी बँक निवडावी ज्यामध्ये तुम्हाला अतिशय कमी व्याजदराने कार लोन मिळू शकेल.

कार लोन मिळवण्यासाठी तुम्ही अ‍ॅक्सिस बँकेकडून कर्जही घेऊ शकता. अ‍ॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराने कार लोन देते. जाणून घेऊया अ‍ॅक्सिस बँकेच्या कार लोनच्या डिटेल्सबद्दल.

अ‍ॅक्सिस बँक कार लोन

सर्वप्रथम अ‍ॅक्सिस बँकेच्या कार लोनच्या व्याजदरांबद्दल बोलूया. अ‍ॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 8.40 टक्के सुरुवातीच्या व्याजदराने कार लोन देते. हा व्याजदर आपल्या सिबिल स्कोअरनुसार बदलू शकतो.

7 लाख रुपयांच्या कार लोनवर मासिक EMI किती?

जर तुम्ही अ‍ॅक्सिस बँकेकडून पूर्ण 5 वर्षांसाठी 7 लाख रुपयांचे कार लोन घेत असाल तर तुम्हाला 8.40 टक्के व्याजदराने दरमहा 14,328 रुपये EMI म्हणून भरावे लागतील. अशा तऱ्हेने संपूर्ण 5 वर्षात तुम्ही संपूर्ण 8,59,671 रुपये बँकेला भराल, ज्यात तुमचे व्याज फक्त 1,59,671 रुपये असेल.

कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 या नियमाची माहिती असायला हवी. याविषयी पुढे जाणून घ्या.

20/4/10 फॉर्म्युला म्हणजे काय?

कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 फॉर्म्युल्याची माहिती असणे आवश्यक आहे. कार लोन घेण्यापूर्वी जर तुम्ही हा फॉर्म्युला लावला तर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जाणून घेऊया काय आहे 20/4/10 फॉर्म्युला.

‘हे’ सूत्र समजून घ्या

कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 या नियमाची माहिती असायला हवी. येथे 20 म्हणजे 20 टक्के डाऊन पेमेंट, म्हणजेच कार खरेदी करताना तुम्हाला कारच्या एकूण किमतीच्या 20 टक्के इतके डाउन पेमेंट करावे लागेल. 4 म्हणजे 4 वर्षांचा कालावधी, तुम्ही 4 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी तुमचे कर्ज घेऊ नये. तर 10 म्हणजे पगाराच्या 10 टक्के. तुमचा मासिक EMI तुमच्या पगाराच्या फक्त 10 टक्क्यांपर्यंत असावा.

जर तुमचा पगार दरमहा 1 लाख रुपये असेल तर तुमच्याकडे 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मासिक EMI असणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी