इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात तगडी फाईट, OLA ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी बाईक

मागच्या काही दिवसांत अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहनं बाजारात आली आहेत. ग्राहकांचीही त्यांना पसंती मिळत आहे. ओला (OLA) कंपनीने भारतात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची (OLA Electric Scooter) घोषणा केली होती. तेव्हापासून सर्वजण या बाईकच्या प्रतीक्षेत आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात तगडी फाईट, OLA ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी बाईक
ओला इलेक्ट्रिक स्कूटर, सिंपल वन
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 4:58 PM

मुंबई : सध्या पेट्रोलच्या (Petrol Price) वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicles) सर्वांचा कल वाढत आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांत अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहनं बाजारात आली आहेत. ग्राहकांचीही त्यांना पसंती मिळत आहे. अशात ओला (OLA) कंपनीने भारतात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची (OLA Electric Scooter) घोषणा केली होती. तेव्हापासून सर्वजण या बाईकच्या प्रतीक्षेत आहेत. 15 ऑगस्टला ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत येत आहे. स्कूटरची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जात असल्यानं बाजारात स्कूटरची मोठी चर्चा सुरू आहे. या बाईकची अॅडव्हान्स बुकींगही सुरू करण्यात आली आहे. (Big competition between both Ola and Simple One company electric scooters will be launched on 15th August)

सिंपल वन स्कूटर देणार ओलाला टक्कर!

दुसरीकडे ओलाला टक्कर देण्यासाठी आणखी एक स्कूटर भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. बंगळुरूची इलेक्ट्रिक व्हेहिकल स्टार्टअप कंपनी सिंपल एनर्जी (Simple Energy) आपली इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच भारतीय बाजारपेठेत उतरवणार आहे. विशेष म्हणजे ओलाप्रमाणेच 15 ऑगस्टलाच सिंपल एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. या सिंपल वन स्कूटरची (Simple One Electric Scooter) बुकींगही सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात 13 राज्यांमध्ये ही स्कूटर लॉन्च केली जाणार आहे.

13 राज्यांमध्ये लॉन्च होणार सिंपल वन स्कूटर

सिंपल एनर्जीने 13 राज्यांमध्ये आपली स्कूटर लॉन्च करण्याची योजना आखली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाब राज्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यांत या राज्यांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचा विस्तार करण्यात येईल. शिवाय या राज्यांमध्ये एक्सपिरियन्स सेंटरही उभारण्यात येणार आहेत. पुढच्या 2 वर्षांत या क्षेत्रात 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीचं नियोजन आहे. (Big competition between both Ola and Simple One company electric scooters will be launched on 15th August)

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ठ्ये

सिंपल वन स्कूटरमध्ये 4.8KWh लिथियम आयन बॅटरी आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर स्कूटर 240 किमी जाऊ शकते. विशेष म्हणजे या स्कूटरची बॅटरी स्कूटरपासून वेगळी करता येणं शक्य आहे. ज्यामुळे बॅटरी चार्ज करण्यास सोपी जाऊ शकते. सिंपल वन स्कूटरचा सर्वाधिक वेग 100 किमी प्रतितास आहे. सोबतच 3.5 सेकंदाच स्कूटर 0 ते 50 किमीचा वेग पकडू शकते.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ठ्ये

याऊलट ओलाने आपल्या स्कूटरबाबत अधिक माहिती समोर येऊ दिलेली नाही. काही चर्चांनुसार ओला इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 150 किमी अंतर जाऊ शकते. स्कूटरची चार्जिंग वेगानं होत असल्याचं कंपनीचा दावा आहे. ज्यात 18 मिनीटं स्कूटर चार्ज केल्यानंतर ती 75 किमी जाऊ शकते असं ओला कंपनीने सांगितलं आहे. शिवाय या स्कूटरच्या बेस मॉडलची टॉप स्पीड 45 किमी प्रतितास आहे. मिड व्हेरिएन्टमध्ये हा वेग 70 किमी प्रतितास तर टॉप मॉडेलमध्ये 95 किमी प्रतितास आहे.

काय आहे किंमत?

पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती जास्त आहेत. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 80 हजार ते 1 लाखादरम्यान असण्याची शक्यता आहे. तर सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.10 लाख ते 1.20 लाखादरम्यान असू शकते.  (Big competition between both Ola and Simple One company electric scooters will be launched on 15th August)

संबंधित बातम्या :

Ola Electric Scooter चा भारतातील 1000 शहरांमध्ये रेकॉर्ड, 15 ऑगस्टला लाँचिंग

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

ह्युंदाय आतापर्यंतची सर्वात छोटी एसयूव्ही लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.