ह्युंदाय आतापर्यंतची सर्वात छोटी एसयूव्ही लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

आगामी ह्युंदाय मायक्रो एसयूव्ही जी इंटर्नल कोडनेम एएक्स 1 (AX 1) या नावाने परिचित होती, येत्या काही दिवसांत कंपनी या एसयूव्हीचं प्रोडक्शन सुरु करु शकते.

ह्युंदाय आतापर्यंतची सर्वात छोटी एसयूव्ही लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Hyundai Casper
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 7:38 AM

मुंबई : आगामी ह्युंदाय मायक्रो एसयूव्ही जी इंटर्नल कोडनेम एएक्स 1 (AX 1) या नावाने परिचित होती, येत्या काही दिवसांत कंपनी या एसयूव्हीचं प्रोडक्शन सुरु करु शकते. त्यानंतर या कारला ह्युंदाय कॅस्पर म्हटले जाईल. ही नवीन एसयूव्ही सर्वात आधी कोरियामध्ये विक्रीसाठी सादर केली जाईल आणि त्यानंतर भारतासारख्या अन्य उदयोन्मुख बाजारपेठांमध्येदेखील उपलब्ध येईल. ह्युंदायने कोरियामध्ये कॅस्पर नावाची नोंदणी केली आहे आणि अनेक अहवालांनुसार, कोरियन मार्केटमध्ये या कारला AX1 मायक्रो-एसयूव्ही असेदेखील नाव दिले जाऊ शकते. (Hyundai Casper to be the brand’s smallest SUV, will make debut soon)

मायक्रो-एसयूव्हीला कोरियामध्ये कॅस्पर म्हटले जाईल की नाही हे सध्या सांगण्यात आले नाही. पण ह्युंदाय कंपनी बाजारपेठेनुसार आपल्या वाहनांना वेगवेगळी नावे देत असते. उदाहरणार्थ, काही मार्केटमध्ये क्रेटा ही कार ix25 म्हणून विकली जाते, तर काही देशांमध्ये व्हेर्नाला सोलारिस किंवा अॅक्सेंट म्हणून देखील संबोधले जाते.

त्याचप्रमाणे, कॅस्पर (AX1) ची ठिकाणांनुसार मार्केटिंग नावे भिन्न असू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरपर्यंत ही कार जागतिक पातळीवर लाँच होऊ शकते, त्यानंतरच इतर बाजारपेठेत आणि भारतातही ही कार सादर केली जाईल. कॅस्पर ह्युंदायची सर्वात छोटी एसयूव्ही असेल, म्हणजे ती सब-फोर-मीटर वेन्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीपेक्षा लहान असेल. हे वाहन ह्युंदायच्या के 1 कॉम्पॅक्ट कार प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, ज्यावर ग्रँड i10Nios आणि सॅंट्रोदेखील बनवण्यात आली आहे.

कारमध्ये काय असेल खास?

ह्युंदाय कॅस्पर 3,595mm लांब, 1,595mm रुंद आणि 1,575mm उंच असेल. याचा अर्थ ही ह्युंदायची सर्वात छोटी कार असेल. परंतु ही कारी ह्युंदायची सर्वात छोटी कार असलेल्या सँट्रो हॅचबॅकपेक्षा थोडी उंच असेल. सँट्रो 3,610mm लांब, 1,645mm रुंद आणि 1,560mm इतकी उंच आहे.

तरुणांना आकर्षित करण्यासाठी ही कार डिझाईन करण्यात आली आहे. कॅस्परमध्ये 1.2-लीटर, फोर-सिलेंडर एस्पिरेटेड इंजिन दिले जाईल जे ग्रँड आय 10 Nios (जे 83 एचपी पॉवर आणि 114 एनएम टॉर्क जनरेट करतं.) ला पॉवर देतं. कोरियन कारमेकरने या कारची किंमत कमी ठेवण्यासाठी सॅन्ट्रोच्या 1.1-लीटर, थ्री-सिलिंडर पेट्रोल इंजिनसह मायक्रो-एसयूव्हीचे लोअर व्हेरिएंट्सदेखील सादर करण्याची तयारी केली आहे.

ह्युंदाय कॅस्परचा थेट प्रतिस्पर्धी टाटा एचबीएक्स मायक्रो-एसयूव्ही ही कार असेल. याव्यतिरिक्त, यास मारुती सुझुकी इग्निस आणि महिंद्रा केयूव्ही 100 सारख्या काही हाय रायडिंग हॅचबॅककडूनदेखील स्पर्धेला सामोरे जावे लागेल.

इतर बातम्या

जीप 2023 मध्ये आणणार आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या यात काय असेल खास

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

(Hyundai Casper to be the brand’s smallest SUV, will make debut soon)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.