BMW ची S1000R भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बीएमडब्ल्यू मोटरराड इंडिया (BMW Motorrad) लवकरच बीएस 6-अनुरूप S1000R बाईक भारतीय बाजारात सादर करणार आहे.

BMW ची S1000R भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
BMW S1000R

मुंबई : बीएमडब्ल्यू मोटरराड (BMW Motorrad) लवकरच बीएस 6-अनुरूप S1000R बाईक भारतीय बाजारात सादर करणार आहे. ही बाईक भारतात डुकाटी स्ट्रीट फायटर व्ही 4 आणि कावासाकी झेड एच 2 सारख्या बाईकशी स्पर्धा करेल. ही बाईक आधीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहे आणि भारतीय मॉडेल जवळपास परदेशात विकल्या जाणाऱ्या युनिटप्रमाणेच असेल. (BMW S1000R BS 6 to launch in India soon. check price and features)

2021 साठी, कंपनी नवीन S1000R एक्सीटीरियरमध्ये अनेक अपडेट्स करुन बाईक सादर करणार आहे. बाईकच्या पुढील बाजूस नवीन एलईडी हेडलाइट सेटअपचा वापर करण्यात आला आहे. नवी हेडलँप 2021 BMW G310R आणि F900R बाईक्सप्रमाणे डिझाईन लाईनवर बनवण्यात आले आहेत. तसेच या बाईकमधील इतर डिझाईन अपडेट्समध्ये रीमास्टर्ड रेडिएटर स्राउड, फ्यूल टँक आणि बेली पॅनचा समावेश आहे.

BMW S1000R मध्ये काय आहे खास?

BMW S1000R मोटरसायकलच्या इलेक्ट्रॉनिक्स किटमध्ये तीन राइडिंग मोड्स (रेन, रोड आणि डायनॅमिक), ABS प्रो, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि हिल स्टार्ट कंट्रोल या स्टँडर्ड फीचर्सचा समावेश आहे. त्याशिवाय यात राइडिंग मोड्स प्रो, इंजिन ब्रेक कंट्रोल, पॉवर व्हीली कंट्रोल आणि डायनॅमिक ब्रेक कंट्रोल (DBC) यांसारख्या इतर काही ऑप्शनल फीचर्सचा समावेश आहे.

बाईकच्या मध्यभागी एक युरो 5 / बीएस 6-अनुरूप 999 सीसी, इनलाइन-फोर सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे जे 11,000 आरपीएमवर 165bhp पॉवर आणि 9,250rpm वर 114Nm पीक टॉर्क उत्पन्न करते. हे ऑप्शनल शिफ्ट असिस्टंट प्रो बिडायरेक्शनल क्विकशिफ्टरसह 6-स्पीड गीयरबॉक्सवर मेटेड केले जाते. असा दावा केला जात आहे की, या सेटअपद्वारे 6.2-लीटर / 100 किमी किंवा 16.12kmpl ची इंधन क्षमता मिळते.

किंमत

असं म्हटलं जातंय की, लाँचिंगनंतर भारतीय बाजारात या बाईकची किंमत 17 ते 18 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी असू शकते.

इतर बातम्या

पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी

अवघ्या 1200 रुपयात घरी न्या Bajaj ची शानदार बाईक, एक लीटर पेट्रोलमध्ये 90 किमी मायलेज

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

(BMW S1000R BS 6 to launch in India soon. check price and features)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI