अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील
या सेकंड हँड होंडा अ‍ॅक्टिव्हाची किंमत 38 हजार रुपये आहे.

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात बाईक आणि स्कूटरची लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही. जर तुम्ही स्वतःसाठी स्वस्त स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, परंतु कमी बजेटमुळे हात अखडता घेत असाल, तर आज आम्ही तुम्हाला 40 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या एका स्कूटरबद्दल सांगणार आहोत.

अक्षय चोरगे

|

Mar 18, 2022 | 5:09 PM

मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात बाईक आणि स्कूटरची लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही. जर तुम्ही स्वतःसाठी स्वस्त स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, परंतु कमी बजेटमुळे हात अखडता घेत असाल, तर आज आम्ही तुम्हाला 40 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या एका स्कूटरबद्दल सांगणार आहोत. आम्ही होंडा अॅक्टिव्हा 4जी (Honda Activa 4G) या स्कूटरबद्दल सांगणार आहोत. ही स्कूटर सेकंड हँड सेगमेंटमधील (Second Hand) आहे. ही स्कूटर Bikes24 नावाच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली आहे. जर तुम्ही बाजारातून नवीन Activa स्कूटर खरेदी करत असाल तर तुम्हाला 81,583 रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागतील. दरम्यान, आम्ही तुम्हाला ज्या डीलमध्ये (Best Deal) सांगणार आहोत, त्याद्वारे तुम्ही Activa स्कूटर निम्म्या किंमतीत खरेदी करु शकता.

  1. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही स्कूटर दिल्लीच्या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे आणि ही फर्स्ट ओनर स्कूटर आहे. या स्कूटरची किंमत 38 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. यासह, कंपनीने त्यावर 12 महिन्यांची वॉरंटी देखील देऊ केली आहे.
  2. या स्कूटरने आतापर्यंत 70 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे आणि ती 2017 मध्ये खरेदी करण्यात आली होती. ही स्कूटर दिल्लीच्या DL 03 RTO मध्ये रजिस्टर्ड आहे.
  3. वेबसाइटने याबाबतचा अहवालही आपल्या साईटवर सादर केला आहे, ज्यामध्ये हेडलाइट आणि टेललाइट्ससह बरीच माहिती उपलब्ध आहे. तसेच, त्याची बॅटरी कंडिशन देखील चांगली आहे. या स्कूटरचा स्पीडोमीटरदेखील नीट काम करत आहे.
  4. Honda Activa 4G मध्ये 109.19 cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.11 PS पॉवर आणि 9 Nm टॉर्क जनरेट करू शकते.
  5. ही स्कूटर 60 kmpl मायलेज देते. यामध्ये ड्रम ब्रेक आणि ट्यूबलेस टायरचा वापर करण्यात आला आहे.

इतर बातम्या

जुनी वाहनं 8 पट शुल्क भरुन Re register करा, अन्यथा भंगारात काढण्याशिवाय पर्याय नाही

शानदार लूक, ॲडव्हान्स फीचर्ससह Renault Kwid MY22 लाँच, किंमत…

100 फुट लांब कार, हेलिपॅड, गोल्फ कोर्स आणि स्विमिंग पूलसह अनेक सुविधांनी सुसज्ज, गिनीजमध्ये नोंद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें