AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Motors: TATA च्या ‘या’ गाड्यांवर बंपर सूट! प्रसिध्द मॉडेल्सवर 60 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

Tata Harrier : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्स आपल्या कार्समध्ये वेळोवेळी विविध बदल करीत आलेला आहे. या शिवाय आपल्या कार्सवर अनेक ऑफर्स देण्यात येत असतात. टाटाने आपल्या एसयुव्ही सेगमेंटच्या गाड्यांवरही आकर्षक डिस्काउंट दिले आहे.

Tata Motors: TATA च्या ‘या’ गाड्यांवर बंपर सूट! प्रसिध्द मॉडेल्सवर 60 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट
टाटा हॅरीअरImage Credit source: instagram
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jun 04, 2022 | 11:58 AM
Share

भारतात सर्वाधिक विक्री होत असलेल्या गाड्यांच्या यादीमध्ये टाटा मोटर्सचा (Tata Motors) दुसरा क्रमांक लागतो. टाटाने ह्युंदाईला (Hyundai) मागे टाकत हे स्थान पटकाविले आहे. मेमध्ये टाटाने 43 हजारांहून जास्त युनिट्‌सची विक्री केली आहे. ग्राहकांना आपल्याकर्ड आकर्षित करण्यासाठी टाटा आपल्या कार्समध्ये वेळोवेळी विविध बदल करीत आलेला आहे. या शिवाय आपल्या कार्सवरदेखील अनेक ऑफर्स देण्यात येत असतात. टाटाने आपल्या एसयुव्ही सेगमेंटच्या गाड्यांवरही आकर्षक डिस्काउंट (Discount) दिले आहे. टियागो, नेक्सॉन, सफारी आणि हॅरियरसारख्या अनेक गाड्यांना हे डिस्काउंट देण्यात येत आहे. या लेखातून कोणत्या गाड्यांना किती डिस्काउंट मिळतेय, ते जाणून घेउया.

View this post on Instagram

A post shared by Tata Harrier Official (@tataharrier)

1) टाटा हॅरियर : टाटा मोटर्सची हॅरियर ही ग्राहकांच्या आवडत्या कारमधील एक आहे. लुक्स, परफॉर्मेंस आणि डायनिमिक्सच्या बाबतीत ही कार अतिशय आकर्षक आहे. या कारमध्ये 6 स्पीड मॅन्यूअल गिअर देण्यात आले आहे. शिवाय यात ऑटोमॅटीक ट्रांसमिशनदेखील बाजारात उपलब्ध आहे. टाटा हॅरियरवर 60 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटमध्ये एक्सचेंज ऑफर 40 हजार, कॉरर्पोरेट डिस्काउंट 20 हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.

2) टाटा सफारी : टाटा हॅरियरशिवाय सफारी या दुसर्या एका लोकप्रिय कारवरही मोठे डिस्काउंट मिळत आहे. सफारीवर कंपनी 40 हजार रुपयांचे डिस्काउंट देत आहे. कंपनी एक्सचेंज ऑफरच्या नावावर 40 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. हेरियर सारखे सफारीवर कुठल्याही प्रकारचा कॉरर्पोरेट डिस्काउंट मिळत नाही.

3) टाटा टियागो : टाटाच्या छोट्या कार्समध्ये टियागो सर्वाधिक लोकप्रिय कार आहे. ही कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. सेफ्टी, कंफर्टच्या बाबतीत टाटाची ही कार अतिशय उत्कृष्ठ मानली जाते. टाटा टियागोवर 31500 रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. यात एक्सएम आणि एक्सटी व्हेरिएंटवर 21500 रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. तर एक्सझेड मॉडेलवर 31500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

4) टाटा टिगोर : कंपनीने टाटा टिगोरवर 31500 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट दिले आहे. कारच्या लोअर मॉडेल एक्सई आणि एक्सएम वर 21500 रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. तर एक्सझेड व्हेरिएंटवर 10 हजार रुपयांचे अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. अशा पध्दतीने तुम्ही एकूण 31500 रुपयांचे डिस्काउंट या कारवर मिळवू शकतात.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?