.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 1.67 लाखात

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 1.67 लाखात
Alto 800 Lxi Car प्रातिनिधिक फोटो
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 25, 2021 | 7:05 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Maruti Suzuki Alto 800 Lxi in just rs 167000, know more about it)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.

2016 चं पेट्रोल मॉडल

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता. आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Alto 800 Lxi या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही एक रिफर्बिश्ड कार असून 2016 चं मॉडल आहे. ही एक पेट्रोल इंजिनवाली कार असून आतापर्यंत 53,362 किलोमीटरपर्यंत धावली आहे.

4 लाखांची कार 1.67 लाखात

या मॉडेलचा रंग व्हाईट असून ही कार खरेदी करताना तुम्हाला मॅनुअल ट्रान्समिशनदेखील मिळेल. या कारची मूळ किंमत 4.14 लाख रुपयांपेक्षा जास्त असून असून ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही ही कार 1.67 लाख रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ही सेकेंड हँड Maruti Suzuki Alto 800 LXI www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही कंपनीच्या टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.

टेस्ट ड्राईव्ह बुक करा

या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-800-in-shimla-2016/AXk3HVMaZPsTbFxueCOX) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. सोबतच वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल. सोबतच तुम्ही वेबसाईटद्वारे या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करु शकता.

Maruti Alto 800 चे फीचर्स

मारुती सुझुकीच्या Alto 800 या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनसह 796cc चं इंजिन मिळेल. हे इंजिन 6000 आरपीएमवर 47.3bhp पॉवर आणि 3500 आरपीएमवर 69Nm टॉर्क जनरेट करते. कारला प्रति लीटर 22.05 किलोमीटरचे मायलेज मिळते आणि या कराची एक्स-शोरूम किंमत 4.14 लाख रुपये इतकी आहे.

अनेक पर्याय उपलब्ध

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर अशा बर्‍याच सेकेंड हँड मोटारी पाहायला मिळत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार पडताळून पाहू आणि खरेदी करू शकता.

(सूचना : या बातमीत संबंधित कारबद्दल दिलेली माहिती ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर अथवा कारच्या मालकाशी संपर्क साधावा. तसेच तुम्ही जर सेकेंड हँड कार खरेदी करत असाल तर सर्वात आधी गाडीचे कागदपत्र, डेटिंग पेटिंग पाहून घ्या, त्यानंतर गाडी चालवून पाहा. तसेच गाडी घेताना सोबत एखाद्या मेकॅनिकला न्या, त्याच्या सल्ल्यानंतरच खरेदीची प्रक्रिया सुरु करा.)

इतर बातम्या

Baleno, Ciaz, Nexa सह Maruti च्या गाड्यांवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट

बंपर ऑफर! मारुतीची CNG कार अवघ्या 34 हजारात खरेदीची संधी

Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

(bumper offer buy Maruti Suzuki Alto 800 Lxi in just rs 167000, know more about it)

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर