अवघ्या 85 हजारात खरेदी करा 2.13 लाखांची Royal Enfield Thunderbird 500

अवघ्या 85 हजारात खरेदी करा 2.13 लाखांची Royal Enfield Thunderbird 500
Royal Enfield Thunderbird 500

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

अक्षय चोरगे

|

Mar 16, 2021 | 12:17 PM

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Royal Enfield Thunderbird 500 in just Rs 85000)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 85 हजारात Royal Enfield Thunderbird 500

CredR वर तुम्हाला केवळ 85 हजार रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Royal Enfield Thunderbird 500 बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 500cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही सेकेंड ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Delhi-NCR-Kondli-Extension/Royal-Enfield-Thunderbird-500/16642) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक दिल्लीतली आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 6335 किलोमीटर धावली आहे. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

Royal Enfield Thunderbird 500X ABS ची किंमत

Thunderbird 500X ABS या बाईकची एक्स शोरुम किंमत 2.13 लाख रुपये इतकी आहे. नॉन एबीएस बाईकपेक्षा ही किंमत 14 हजार रुपयांनी अधिक आहे. या बाईकमध्ये 499cc चं एयर-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 5250rpm वर 27.2hp पॉवर आणि 4000rpm पर 41.3Nm टॉर्क जनरेट करतं. सोबतच हे इंजिन 5-स्पीड गियरबॉक्सने सुसज्ज असे आहे.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

7 रुपयात 100 KM प्रवास करा, ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन, लायसन्सची गरज नाही

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें