अवघ्या 9,999 रुपयात घरी न्या Triumph ची नवी Trident 660

ब्रिटीश मोटारसायकल निर्माती कंपनी Triumph दीर्घ काळापासून भारतात आपली ट्रायडंट 660 बाईक लाँच करण्याची योजना करत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 6:00 AM, 25 Mar 2021
अवघ्या 9,999 रुपयात घरी न्या Triumph ची नवी Trident 660
Triumph trident 660

मुंबई : ब्रिटीश मोटारसायकल निर्माती कंपनी Triumph दीर्घ काळापासून भारतात आपली ट्रायडंट 660 बाईक (Triumph Trident 660) लाँच करण्याची योजना आखत आहे. या बाईकच्या लाँचिंगबाबत सतत कयास सुरू होते, दरम्यान काही दिवसांपूर्वी कंपनीने या बाइकची टीझर इमेज जारी केली होती. दरम्यान, ही बाईक 6 एप्रिल रोजी लाँच केली जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बाईकची लॉन्चिंग डेट जाहीर केली आहे. (Buy Triumph trident 660 with 9999 Rs easy EMI)

ट्रायम्फ इंडियाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आलेल्या टीझर इमेजमध्ये दुचाकीची केवळ हेडलाइट पाहायला मिळाली आहे. तसेच त्यामध्ये लिहिले आहे की लवकरच ट्रायम्फ ट्रायडंट 660 (Triumph Trident 660) बाजारात सादर केली जाईल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या बाईकसाठी बुकिंग सुरू झाले आणि तेव्हापासून लोक या बाईकच्या प्रतीक्षेत आहेत.

New Triumph Trident 660 ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक आहे, या बाईकचे बुकिंग नोव्हेंबर 2020 मध्ये सुरू झाले असून ग्राहक फक्त 50,000 रुपये देऊन ही बुक करू शकतात. कंपनी ग्राहकांसाठी खास फायनान्स सर्व्हिसही देत ​​आहे, ज्यामध्ये ग्राहक ही बाईक 9,999 रुपयांच्या ईएमआयमध्ये खरेदी करू शकतात. ट्रायम्फ मोटरसायकलकडून मर्यादित काळासाठी ही ऑफर दिली जात आहे. कंपनी ही बाईक 7 ते 8 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच करु शकते.

दमदार इंजिन

या बाईकच्या इंजिनविषयी बोलायचे झाले तर 2021 ट्रायम्फ ट्रायडंट 660 (2021 Triumph Trident 660) ला एक नवीन 660cc ट्रिपल सिलेंडर इंजिन मिळेल जे 10,250 आरपीएम वर जास्तीत जास्त 80bhp पॉवर आणि 6,250 आरपीएम वर 64nm पीक टॉर्क जनरेट करेल. या इंजिनसह स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6 स्पीड गिअरबॉक्स देखील उपलब्ध असेल.

Trident 660 चं डिझाईन आणि फीचर्स

2021 Triumph Trident 660 मध्ये तुम्हाला नवीन-रेट्रो स्टाईल राऊंड एलईडी हेडलॅम्प्स, बीफी फोर्क्स, सेल्फ-कॅन्सिलिंग एलईडी इंडिकेटर अशी वैशिष्ट्ये मिळतील. याशिवाय यामध्ये एलईडी लायटिंग, राऊंड कन्सोलवर पूर्णपणे डिजिटल युनिट मिळेल, ज्यामध्ये स्पीड, रीव्ह्ज, फ्यूल स्टेट आणि सिलेक्टेड गियरची माहिती मिळेल. तसेच या बाईकच्या खालच्या बाजूला हाफ कलर टीएफटी पॅनेल असेल, ज्याद्वारे आपण आपला स्मार्टफोन कनेक्ट करू शकता. यासाठी, आपल्याला एक स्वतंत्र मॉड्यूल खरेदी करावे लागेल.

2021 Triumph Trident 660 ची किंमत

या बाईकच्या किंमतीबद्दल कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही, परंतु 7 लाख रुपयांच्या किंमतीसह ही बाईक बाजारात सादर केली जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तथापि, आपल्याला ही बाईक बुक करायची असल्यास टोकनची रक्कम 50,000 रुपये देऊन तुम्ही बुकिंग करू शकता. भारतात ही बाईक कावासाकी झेड 650 (Kawasaki Z650) आणि होंडा सीबीआर 650 आरशी (Honda CBR650R) स्पर्धा करेल.

इतर बातम्या

कार्सपाठोपाठ बाईक-स्कूटरदेखील महागणार, हिरो मोटोकॉर्पकडून Price Hike ची घोषणा

रॉयल एनफील्ड Interceptor 650 आणि Continental GT 650 चं नवं मॉडेल लाँच, किंमत…

1.5 युनिट वीजेवर 100 किलोमीटर धावणार, नवी इलेक्ट्रिक बाईक बाजारात

(Buy Triumph trident 660 with 9999 Rs easy EMI)