22 किलोमीटरहून जास्त मायलेज, किंमत 3 लाखांपासून सुरु, देशात ‘या’ तीन कार्सना सर्वाधिक पसंती

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत आपण जबरदस्त मायलेज (Mileage) असलेली कार खरेदी करणे गरजेचे आहे.

22 किलोमीटरहून जास्त मायलेज, किंमत 3 लाखांपासून सुरु, देशात 'या' तीन कार्सना सर्वाधिक पसंती

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत आपण जबरदस्त मायलेज (Mileage) असलेली कार खरेदी करणे गरजेचे आहे. यासह या कारचा परफॉर्मन्सदेखील चांगला असायला हवा, जेणेकरुन आपल्याला गाडी चालविण्यास कोणतीही अडचण येऊ नये. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशाच काही मोटारींविषयी माहिती देणार आहोत, ज्यांचा परफॉर्मन्स दमदार आहे आणि त्यात तुम्हाला उत्तम मायलेजही मिळेल.

एक लीटर पेट्रोलमध्ये आपण या गाड्या कित्येक किलोमीटर चालवू शकता आणि यासह आपल्याला ती कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. या गाड्यांच्या किंमती 3 लाख रुपयांपासून सुरु होतात. चला तर मग या कमी किंमत आणि जास्त मायलेज देणाऱ्या कार्सबद्दल माहिती जाणून घेऊयात… (Cars in starting price of Rs 3 lakh and mileage of 22 Kmpl)

Tata Tiago मध्ये 20 Kmpl पर्यंतचं मायलेज

ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 20 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. ही कार XE, XT, XTA, XZA, XZA, XZ +, XZ + DT, XZA + आणि XZA + DT सह 9 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 4.85 लाख ते 6.84 लाख रुपयांदरम्यान आहे. यामध्ये तुम्हाला 1.2 लीटरचं पेट्रोल इंजिन मिळेल जे 5-स्पीड मॅनुअल किंवा ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येतं.

Renault Kwid मध्ये 22 Kmpl मायलेज

ही कार दोन पेट्रोल इंजिनांसह येते. ज्यामध्ये 0.8 लीटर आणि दुसरं 1.0 लीटरचं इंजिन आहे. ही कार पाच वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये येते. ज्यामध्ये STD, RXE, RXL, RXT आणि Climber चा समावेश आहे. ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 22 किलोमीटरपर्यंत धावते. या कारची किंमत 3.12 लाख रुपये ते 5.31 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही एक्स शोरुम दिल्लीतली किंमत आहे.

Maruti Alto मध्ये 22.05 Kmpl मायलेज

या कारमध्ये कंपनीने 0.8-लीटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 48PS पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करतं. ही कार तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये स्टँडर्ड, एल आणि व्ही वेरिएंटचा समावेश आहे. यापैकी एल व्हेरिएंटमध्ये तुम्हाला सीएनजी किट मिळेल. Maruti Alto कारची किंमत 2.99 ते 4.48 लाख रुपयांदरम्यान आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 22.05 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते.

इतर बातम्या

दुरुस्ती आणि मेंटेनन्सचे अधिकचे पैसे विसरा, MG Motors चं ग्राहकांना गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

अवघ्या तीन महिन्यात एलन मस्कची पलटी, Tesla कंपनी Bitcoin मध्ये पेमेंट स्वीकारणार नाही, कारण…

सिंगल चार्जवर तब्बल 800 किमी धावणार, 3 सेकंदात 100 किमी वेग, MG ची इलेक्ट्रिक कार बाजारात

(Cars in starting price of Rs 3 lakh and mileage of 22 Kmpl)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI