AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, 71 हजारांच्या स्कूटरसाठी 15 लाखांची नंबर प्लेट

फॅन्सी नंबर प्लेटची (Fancy Number Plates) लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही आणि त्यासाठी लाखो रुपये जादा मोजायलाही अनेकजण तयार असतात. देशातील अनेक राज्ये फॅन्सी नंबर प्लेटसाठी लिलावही करतात.

चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, 71 हजारांच्या स्कूटरसाठी 15 लाखांची नंबर प्लेट
Honda Activa
| Updated on: Apr 19, 2022 | 3:51 PM
Share

Honda Activa owner pays Rs 15 lakh : फॅन्सी नंबर प्लेटची (Fancy Number Plates) लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही आणि त्यासाठी लाखो रुपये जादा मोजायलाही अनेकजण तयार असतात. देशातील अनेक राज्ये फॅन्सी नंबर प्लेटसाठी लिलावही करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, एका व्यक्तीने होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरच्या (Honda Activa Scooter) नंबर प्लेटसाठी तब्बल 15 लाख रुपये मोजले आहेत. चंदिगड नोंदणी आणि परवाना प्राधिकरणाने (Chandigarh Registration and Licensing Authority) काही वाहनांच्या नंबर प्लेटचा लिलाव आयोजित केला होता. या लिलावात प्राधिकरणाला दीड कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

या लिलावादरम्यान 0001 क्रमांक देखील लिस्टेड होता. जो ब्रज मोहन नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या होंडा अॅक्टिव्हासाठी खरेदी केला आहे. हा एक फॅन्सी नंबर आहे. या लिलावादरम्यान ही नंबर प्लेट 15 लाख रुपयांना विकली गेली आहे. रिपोर्ट्सनुसार, ब्रज मोहन यांच्याकडील Honda Activa ची किंमत 71 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. एचटी ऑटोच्या रिपोर्टनुसार, या स्कूटरचा नंबर आता CH01-CJ-0001 असा असेल.

महागडी नंबर प्लेट कारसाठी वापरणार?

ही महागडी नंबर प्लेट नेहमीच होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवर दिसणार नाही. या नंबर प्लेटचे खरेदीदार ब्रज मोहन यांनी सांगितले की, ते आपल्या भविष्यातील कारसाठी ही नंबर प्लेट वापरणार आहेत. मोहन यांनी एका लिलावादरम्यान ही फॅन्सी नंबर प्लेट खरेदी केली आहे.

चंदीगड नोंदणी आणि परवाना प्राधिकरणाने नवीन वाहन सिरीज CH 01-CG अंतर्गत काही फॅन्सी नंबर प्लेट्सचा नुकताच लिलाव केला. हा लिलाव 14 ते 16 एप्रिल दरम्यान पार पडला. या लिलावात प्राधिकरणाला दीड कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या दरम्यान 378 प्लेट्सची विक्री झाली आहे.

तीन सर्वात महाग नंबर प्लेट्स

विकल्या गेलेल्या सर्व नंबर प्लेट्सपैकी, ब्रज मोहनने खरेदी केलेला CH01-CJ-0001 क्रमांक सर्वात महाग विकला गेला आहे. त्याची रिझर्व्ह अमाऊंट (राखीव रक्कम) 50,000 रुपये निश्चित करण्यात आली होती. दसुरी दुसरी सर्वात महाग नंबर प्लेट CH01-CJ-002 आहे, ज्यासाठी ग्राहकाने 5.4 लाख रुपये मोजले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महाग फॅन्सी प्लेट म्हणजे CH01-CJ-003 होती, ज्यासाठी ग्राहकाने 4.2 लाख रुपये मोजले आहेत. या नंबर प्लेट्सची राखीव रक्कम 30,000 रुपये ठेवण्यात आली होती.

यापूर्वी 0001 नंबर प्लेटसाठी 26.05 लाख रुपये मोजावे लागले होते. हा लिलाव 2012 मध्ये झाला होता.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.