AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OLA कंपनीला बाजारात देणार टशन, छत्रपती संभाजीनगरची ही Electric Scooter

Electric Scooter | OLA कंपनीने देशातील बाजारात मांड ठोकली आहे. आता ओलाच्या साम्राज्याला हादरा देण्यासाठी राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथील ही कंपनी बाजारात उतरली आहे. या कंपनीच्या ईव्हीने एकच कहर केला आहे. झक्कास लूक आणि दमदार रेंज यामुळे ही कंपनी ओलासह इतर कंपन्यांना बाजारात टशन देणार हे नक्की.

OLA कंपनीला बाजारात देणार टशन, छत्रपती संभाजीनगरची ही Electric Scooter
| Updated on: Dec 14, 2023 | 2:21 PM
Share

नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : देशातील इलेक्ट्रिक मार्केटमध्ये एक दमदार प्लेअर आला आहे. ओला कंपनीच्या ईव्हीने सध्या बाजारात मांड ठोकली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रस्थ वाढत आहे. बाजारात चांगल्या दर्जाच्या, आकर्षक आणि जास्त रेंजच्या ईव्हीची मागणी वाढली आहे. त्यात अनेक कंपन्या स्पर्धेत आहेत. राज्यातील छत्रपती संभाजीनगरची ही कंपनी पण बाजारात उतरली आहे. ग्राहकांच्या अपेक्षांवर खरं उतरण्यासाठी कंपनीने कसूर सोडली नाही. झक्कास लूक, दमदार रेंजच्या भरवशावर ही कंपनी OLA सह इतर कंपन्यांना टफ फाईट देण्याच्या तयारीत आहे.

Gogoro Crossover मैदानात

Gogoro Crossover असं या कंपनीचे नाव आहे. मुळात ही तैवान टेक्नॉलॉजी फर्म गोगोरो इंकचे युनिट आहे. कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच केली आहे. गोगोरो क्रॉसओवरला इलेक्ट्रिक स्कूटरची SUV म्हटलं जात आहे. ही सर्वात अगोदर B2B सेगमेंटमध्ये येईल. या स्कूटरच्या किंमतीविषयी अजून खुलासा झालेला नाही. या ईव्हीचे सर्वात चांगले वैशिष्ट्ये म्हणजे बॅटरी स्वपिंगची सुविधा, कंपनी देशभरात स्वॅपिंग स्टेशन उभारत आहे. त्याचा ग्राहकांना चांगला फायदा होईल.

छत्रपती संभाजीनगरमधून सुरुवात

तैवान टेक्नॉलॉजी फर्म गोगोरो इंक या कंपनीचे उत्पादन युनिट महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. याठिकाणी क्रॉसओव्हर GX250, क्रॉसओव्हर 50 और क्रॉसओव्हर एस या मॉडेलसह इतर तीन डेरिव्हेटिव्ह तयार करण्यात येत आहे. क्रॉसओव्हर GX250 हे मॉडल लवकरच बाजारात उतरवण्यात येत आहे. तर इतर मॉडेल 2024 मध्ये बाजारात येतील. क्रॉसओव्हर आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचा विस्तार करण्यात येत आहे. दिल्ली आणि गोव्यात हा विस्तार करण्यात येईल. त्यानंतर 2024 च्या पहिल्या सहामाहीत मुंबई आणि पुण्यात हा विस्तार करण्यात येणार आहे.

असे आहेत वैशिष्ट्ये

  • या ईव्हीचे निर्मिती मॉड्यूलर स्टील ऑल टेरेन फ्रेममध्ये होत आहे.
  • आयाताकृती एलईडी हेडलँप ग्राहकांचे लक्ष आकर्षिक करते
  • या ईव्हीचा लूक अत्यंत युनिक ठेवण्यात आला आहे
  • या ईव्हीची लांबी पण इतर स्कूटरपेक्षा अधिक आहे
  • या ईव्ही स्कूटरला स्प्लिट-सीट सेटअप देण्यात आला आहे
  • या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 6.4kW आणि 7.2kW बॅटरीचा पर्याय देण्यात आला आहे
  • या स्कूटरची रेंज 111 किलोमीटर आणि टॉप स्पीड 60 किलोमीटर प्रति तासापेक्षा असेल
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.