Mahindra Thar ला टक्कर, Maruti Suzuki ची 5-डोर SUV सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?

भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) Thar ला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.

Mahindra Thar ला टक्कर, Maruti Suzuki ची 5-डोर SUV सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?
Thar And Jimny

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra and Mahindra) अखेर पुष्टी केली आहे की, कंपनी न्यू जनरेशन थारचं (Mahindra Thar) 5-डोर व्हेरिएंट लाँच करणार आहे. वित्तीय वर्ष 2021 साठी कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर करण्यासाठी कंपनीने ऑनलाईन मीडिया ब्रीफिंगचं आयोजन केलं होतं. दरम्यान, महिंद्राने जाहीर केलं आहे की, कंपनी 2026 पर्यंत नऊ नवीन उत्पादने लाँच करणार आहे आणि 5-डोर थार हे त्यापैकीच एक उत्पादन असेल. (Competition for 5 door Mahindra Thar, Maruti Suzuki to launch 5 door Jimny)

महिंद्राच्या थारला देशभरात मोठी मागणी आहे. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) Thar ला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. मारुती सुझुकीसुद्धा आपल्या ऑफ रोड जिम्नीचं 5-डोर व्हेरिएंट लाँच करण्याची योजना आखत आहे. पुढील वर्षी ही कार भारतीय बाजारात दाखल होईल.

मारुतीच्या या एसयूव्हीचा फोटो नुकताच इंटरनेटवर पाहायला मिळाला आणि तो 5-डोर मॉडेलचा एक नमुना असल्याचे म्हटले आहे. या 5-डोर जिम्नीचे डायमेन्शनही ऑनलाइन लीक झाले आहेत. ही कार 3,850 मिमी लांब, 1,645 मिमी रुंद आणि 1,730 मिमी उंच असेल. यासह, कारचा व्हीलबेस 2,550 मिमी लांब आणि ग्राउंड क्लीयरन्स 210 मिमी इतका असेल.

5-डोर जिम्नीचं इंजिन आणि पॉवर

या वाहनाचं कर्ब वेट 1,190 किलो इतकं आहे, जे नियमित 3 डोर मॉडेलपेक्षा 100 किलो जास्त आहे. यापूर्वी असे म्हटले जात होते की, 5-डोर मॉडेलमध्ये 1.5-लीटर पेट्रोल मोटर (105ps पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते) दिली जाईल. असं इंजिन यापूर्वी S-Cross, Vitara Brezza आणि Ciaz मध्ये पाहायला मिळालं आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.

तथापि, अलीकडील अहवालानुसार या एसयूव्हीमध्ये 48V माइल्ड-हायब्रिड असिस्टन्ससह टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल. जे 1.4 लीटरचे बूस्टरजेट इंजिन असू शकतं जे 140ps पॉवर आणि 230Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन सुझुकी स्विफ्ट स्पोर्टमध्येही उपलब्ध आहे. ही अतिरिक्त पॉवर एसयूव्हीला परफॉर्मन्सच्या दृष्टीने अजून दमदार सिद्ध करते.

5-डोर थार कधी लाँच होणार?

दरम्यान, 5-डोर थारच्या लाँचिंगची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु कंपनीने याची पुष्टी केली आहे की नवीन महिंद्रा थार 5-डोर मॉडेल 2023 आणि 2026 च्या दरम्यान लाँच केलं जाईल. या काळात कंपनी न्यू जनरेशन महिंद्रा बोलेरो, बॉर्न ईव्ही प्लॅटफॉर्मवर बेस्ड काही इलेक्ट्रिक वाहनं, न्यू जनरेशन एक्सयूव्ही 300 आणि दोन नवीन मॉडेल्स लाँच करु शकतं. W620 आणि V201 अशी या दोन मॉडेल्सची नावं आहेत.

संबंधित बातम्या

Mahindra Thar 2020 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल

Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ, तरीही कंपनी कार बंद करण्याच्या विचारात?

क्रॅश टेस्टमध्ये Mahindra THAR पास की नापास?

(Competition for 5 door Mahindra Thar, Maruti Suzuki to launch 5 door Jimny)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI