भारतात धुमाकूळ घालण्याऱ्या कारची पाकिस्तानकडून कॉपी, चिनी कंपनीकडून विक्री

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 05, 2021 | 7:14 PM

सध्या चीनकडे प्रत्येक उत्पादनाची एक कॉपी आहे. म्हणजेच आयफोनपासून ते बुलेटपर्यंत चिनी कंपन्या प्रत्येक उत्पादनाची कॉपी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

भारतात धुमाकूळ घालण्याऱ्या कारची पाकिस्तानकडून कॉपी, चिनी कंपनीकडून विक्री
BJ40 PLUS

मुंबई : चिनी उत्पादनांवर कोणीही सहज विश्वास ठेवू शकत नाही. पूर्वी भारतातही या उत्पादनांची अशीच स्थिती होती. पण आता भारतात बर्‍याच चिनी स्मार्टफोन कंपन्यांवर ग्राहक विश्वास दर्शवतात. सध्या चीनकडे प्रत्येक उत्पादनाची एक कॉपी आहे. म्हणजेच आयफोनपासून ते बुलेटपर्यंत चिनी कंपन्या प्रत्येक उत्पादनाची कॉपी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, की चिनी कंपन्या शेजारच्या पाकिस्तानमध्ये आपली वाहने विकतात. (Copycat Chinese Jeep sold in Pakistan is a Bolero-Thar remix)

असेच काहीसे महिंद्रा थारसोबत (Mahindra Thar) पाहाला मिळाले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये महिंद्रा थार उपलब्ध आहे, परंतु चिनी कंपनीने या कारची कॉपी करुन दुसर्‍या नावाने विक्री करण्यास सुरवात केली आहे. BAIC असे या कंपनीचे नाव आहे आणि या कंपनीने BJ40 प्लस या नावाने महिंद्रा थारची कॉपी कार पाकिस्तानी बाजारात सादर केली आहे.

तुम्ही जर BJ40 हे वाहन काळजीपूर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, ही कार महिंद्रा थारपासून प्रेरित आहे. या कारचे बहुतांश पार्ट्स हे महिंद्रा थारची कॉपी करुन बनवले आहेत. जरी कंपनीने काही भाग वेगळे डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तरीही कंपनीने बहुतेक भाग कॉपी केले आहेत. एका बाजूने तुम्ही ही कार पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की ही कार जीप रँगलर आणि थारची कॉपी आहे.

BAIC BJ40 plus

फीचर्स

BAIC BJ40 मध्ये तुम्हाला 12.3 इंचांचा LCD ड्रायव्हर डिस्प्ले मिळेल. जो 10 इंचांच्या टच इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह येतो. या कारच्या रियरव्ह्यू मिररच्या मागे एक इनबिल्ट डॅशकॅम देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट मिळेल. सोबतच तुम्हाला क्रूज कंट्रोल, पॉवर विंडो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंटोल, रियर एसी वेंटसारखे फीचर्स मिळतील.

या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यामध्ये 2.3 लीटरचं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळेल. जे 250PS पॉवर आणि 350Nm टॉर्क देतं. ही कार 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. तसेच यामध्ये 2.0 लीटरचं डिझेल इंजिनदेखील देण्यात आलं आहे.

इतर बातम्या

देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कारवर बंपर डिस्काऊंट, कमी किंमतीत शानदार फीचर्स आणि मायलेज

कमी किंमतीत दमदार फीचर्स, Volkswagen Polo Comfortline TSI भारतात दाखल

सेकेंड हँड कार मार्केटमध्ये मारुतीच्या ‘या’ SUV ला मोठी मागणी, पुरवठा करणं अवघड

(Copycat Chinese Jeep sold in Pakistan is a Bolero-Thar remix)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI