AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smart Watch : क्रॉसबीट्सची नवीन स्मार्टवॉच लाँच, कॉलिंगसह इनबिल्ट जीपीएस सुविधा उपलब्ध

Crossbeats Ignite Atlas ला प्लास्टिकची बॉडी देण्यात आली असून पाणी आणि डस्टप्रूफसाठी याला IP67 रेटींग मिळालेली आहे. घड्याळाचे एकूण वजन 45 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे.

Smart Watch :  क्रॉसबीट्सची नवीन स्मार्टवॉच लाँच, कॉलिंगसह इनबिल्ट जीपीएस सुविधा उपलब्ध
स्मार्टवॉचImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 1:49 PM
Share

मुंबई :  तुम्ही जर कॉलिंग तसेच इनबिल्ट जीपीएस (GPS) फीचर असलेली स्मार्टवॉच घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी क्रॉसबीट्स इग्नाइटट अटलस (Crossbeats Ignite Atlas) स्मार्टवॉच हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. ही स्मार्टवॉच नुकतीच भारतात लाँच करण्यात आली आहे. क्रॉसबीट्स इग्नाइट ॲटलसमध्ये 30 स्पोर्ट्स मोडसह 1.69 इंचाचा एचडी डिसप्ले देण्यात आलेला आहे. क्रॉसबीट्स इग्नाइट ॲटलस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून या स्मार्टवॉचची (Smartwatch) संपूर्ण माहिती, किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेश्‍नस आदी देण्यात आलेले आहेत.

क्रॉसबीट्स इग्नाइट ॲटलस किंमत

Crossbeats Ignite Atlas कंपनीच्या वेबसाइटवरून ही स्मार्टवॉच प्री-ऑर्डर केली जाऊ शकते. तिची किंमत 5,499 रुपये इतकी आहे. लॉन्चिंग ऑफरअंतर्गत ही स्मार्टवॉच 4,999 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. ही स्मार्टवॉच विविड ब्लॅक, इम्पीरियल ब्लू, स्कार्लेट ग्रीन, स्कार्लेट ग्रे आणि फायरी रेड कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

काय आहेत फीचर्स?

क्रॉसबीट्स इग्नाइट ॲटलस स्मार्टवॉचमध्ये 500 nits ब्राइटनेससह 1.69 इंचाचा IPS HD रिझोल्यूशन डिसप्ले देण्यात आला आहे. Crossbeats Ignite Atlas ला प्लास्टिकची बॉडी असून पाणी आणि डस्टप्रूफींगसाठी IP67 रेटींग मिळालेले आहे. घड्याळाचे एकूण वजन 45 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ 5.0 सपोर्ट दिलेला आहे. या स्मार्टवॉचमध्येत Realtek ची ऑपरेटिंग सिस्टम आहे.

हेल्थ मोड

हेल्थ मोडबाबत बोलायचे झाल्यास, हार्ट रेट मॉनिटरिंग व्यतिरिक्त, यात रक्तदाब मॉनिटर, एसपीओ 2 ट्रॅकिंग, पेडोमीटर, स्ट्रेस मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. त्यात इनबिल्ट जीपीएस व्यतिरिक्त ड्युअल सॅटेलाइट ग्लोनास आणि मल्टी-मोशन अॅक्टिव्हिटी सेन्सर देण्यात आला आहे. या घड्याळात ब्लूटूथ कॉलिंग आणि व्हॉईस असिस्टंटचाही सपोर्ट असेल. हे घड्याळ Strava, Apple Health आणि Google Fit ला देखील सपोर्ट करेल. Crossbeats Ignite Atlas मध्ये मैग्नेटिक पिन चार्जिंगसह 420mAh लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी पॅक उपलब्ध आहे. याच्या बॅटरीबाबत 10 दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.