डुकाटीने लाँच केली तब्बल 800cc स्क्रँबलर अर्बन बाईक, किंमतीवर विश्‍वास बसणार नाही…

अर्बन मोटार्डच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर, 800 सीसी स्क्रँबलर ही भारतातील सर्वात महागडी बाइक ठरणार आहे. डुकाटीने या बाइकची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 11.49 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीच्या सर्वात बजेट स्क्रँबलर आयकन डॉर्कच्या तुलनेत अर्बन मोटार्ड 3 लाख रुपयांनी महाग असणार आहे.

डुकाटीने लाँच केली तब्बल 800cc स्क्रँबलर अर्बन बाईक, किंमतीवर विश्‍वास बसणार नाही...
महादेव कांबळे

|

Jun 29, 2022 | 8:27 PM

मुंबईः डुकाटीने (Ducati) भारतामध्ये 800 सीसी स्क्रँबलर लाइनअपमध्ये अजून वाढ करत अर्बन मोटार्ड बाईकला लाँच केली आहे. दमदार इंजिनसह असलेल्या या बाईकची किंमत पाहून पहिल्यांदा तुम्हाला विश्‍वासदेखील बसणार नाही. स्क्रँबलर बाईकला 11.49 लाख रुपयांच्या (Ex-showroom) सुरुवातीच्या किंमतीवर लाँच करण्यात आले आहे. स्क्रँबलर बाईकच्या (crambler urban motard) किेंमतीमध्ये एखादी चांगली कॉम्पॅक्ट एसयुव्ही

(Compact SUV) येउ शकते त्या किमतीत बाईकला विकण्यात येत असल्याने अनेकांचा यावर विश्‍वासदेखील बसत नाही आहे. कंपनीने बाईकला बीक स्टाइल फ्रंट मडगार्ड, ब्लॅक इंजिन हेड आणि ॲल्यूमिनियम बेल्ट कव्हर सारखे चांगले फीचर्स दिलेले आहेत. स्क्रँबलरमध्ये ही पहिली बाईक आहे, ज्याच्यात 17 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आलेले आहेत. तब्बल 11 लाख रुपये खर्चून या बाईकमध्ये ग्राहकांना नेमकं काय मिळणार? याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

अर्बन मोतार्डचे फीचर्स

डुकाटीची दुसरी स्क्रँबलर बाइक्ससारखी अर्बन मोटार्डदेखील दमदार 803 सीसी, एल ट्विन इंजिनने परिपूर्ण आहे. लेटेस्ट बाइकमध्ये युजर्सला स्लिपर-क्लचसह 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. युजर्सला फ्रंटमध्ये हॅलोजन हेडलेंप, LED DRLSs,LED टेल लाइट आणि इंडीकेटर्स, सीटच्या खाली युएसबी चार्जिंग पोर्ट आणि डुकाटी मल्टीमीडिया सिस्टम सारखे फीचर्स मिळणार आहेत.

नवीन स्क्रँबलरमध्ये नवीन काय मिळणार

नवीन स्क्रँबलरमध्ये युजर्सला ॲल्यूमिनियमची नवीन लोअर सेट हँडलबार मिळणार आहे. डुकाटीने या बाइकला रेड आणि व्हाइट कलर स्कीमसह सादर करण्यात येणार आहे. स्क्रँबलरमध्ये ही एकमेव अशी बाईक आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला 17 इंचाचे अलॉय व्हील मिळणार आहेत. नाइट शिफ्ट व्हर्जनअंतर्गत ही बाइक वायर-स्पोक व्हील आहे. बाइकमध्ये ब्लॅक इंजिन हेड आणि ॲल्यूमिनियम बेल्ट कव्हर देखील देण्यात आले आहेत.

अर्बन मोटार्डच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर, 800 सीसी स्क्रँबलर ही भारतातील सर्वात महागडी बाइक ठरणार आहे. डुकाटीने या बाइकची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 11.49 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीच्या सर्वात बजेट स्क्रँबलर आयकन डॉर्कच्या तुलनेत अर्बन मोटार्ड 3 लाख रुपयांनी महाग असणार आहे. बाइकची किंमत डेजर्ट स्लँडपेक्षाही जास्त असून यात अनेक चांगले फीचर्सही मिळणार आहेत.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें