Hyundai च्या Santro, Grand i10 सह ‘या’ गाड्यांवर 1 लाख रुपयांपर्यंतची सूट

ह्युंदाय इंडियाने (Hyundai India) ग्राहकांसाठी बंपर सूट देण्याची घोषणा केली आहे. Hyundai ने त्यांच्या हॅचबॅक आणि सेडान कार्सवर बंपर सूट दिली आहे.

Hyundai च्या Santro, Grand i10 सह 'या' गाड्यांवर 1 लाख रुपयांपर्यंतची सूट


मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वाहन उद्योगाला आलेली मरगळ यंदा दिवाळीमुळे दूर झाली. गेल्या दोन महिन्यांध्ये देशभरात अनेक वाहन कंपन्यांनी चांगला व्यवसाय केला आहे. कंपन्यांनी सणासुदीच्या मुहुर्तावर अनेक ऑफर्स सादर केल्या होत्या. या महिन्यातही अनेक कार कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देऊ केल्या आहेत.

ह्युंदाय इंडियाने (Hyundai India) ग्राहकांसाठी बंपर सूट देण्याची घोषणा केली आहे. Hyundai ने त्यांच्या हॅचबॅक आणि सेडान कार्सवर बंपर सूट दिली आहे. त्यामध्ये Santro, Grand i10, Grand i10 Nios, Aura आणि Elantra या कार्सचा समावेश आहे. या कार्सवर कंपनीने तब्बल एक लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट सादर केला आहे. जर तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ह्युंदायने तुम्हाला जबरदस्त ऑफर्स देऊ केल्या आहेत. या ऑफर्सवर कार खरेदी करुन तुम्ही पैसे वाचवू शकता. (End year offer on Hyundai Santro Grand i10, Up to Rs 1 Lakh discount On These Cars)

Hyundai Elantra

Hyundai ची प्रिमियम सेडान Hyundai Elantra वर सर्वात मोठा डिस्काउंट दिला आहे. ही कार खरेदी केल्यास ग्राहकांना एक लाख रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. यामध्ये 70,000 रुपयांपर्यंत कॅश बेनिफिट आणि एक्सचेंज बोनस म्हणून 30 हजार रुपये दिले जात आहेत. ग्राहक या कारच्या मॅन्युअल ट्रान्समिशनवर एक लाख रुपयांचा लाभ मिळवू शकतात, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर 60,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. भारतात Hyundai Elantra ची सुरुवातीची किंमत 17.60 लाख रुपये आहे.

Hyundai Aura

Hyundai कंपनीने त्यांची शानदार कार Hyundai Aura वरही 40-70 हजार रुपयांची सूट दिली आहे. यामध्ये 20-50 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 5000 रुपयांच्या कॉर्पोरेट बोनसचा समावेश आहे. भारतात या कारची सुरुवातीची किंमत 5.85 लाखांपासून सुरु होते.

Hyundai Grand i10

Hyundai Grand i10 या कारची सुरुवातीची किंमत 5.91 लाख ते 6.01 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. ग्रँड आय 10 एनओआयएससाठी कॉम्पॅक्ट हॅच पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने एंड इयर सेलमध्ये या कारवर 60 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला आहे. यामध्ये 40,000 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 5000 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बोनस आणि 15,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे.

Hyundai Santro

Hyundai Santro या कारची किंमत 4.63 लाख ते 6.31 लाख रुपयांच्या (सर्व किंमती एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. या कारवर कंपनीने 40-50 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला आहे. या कारच्या बेस वेरियंटवर 40 हजार आणि उर्वरित वेरियंट्सवर 50 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. यामध्ये 30 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 5000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आणि 15,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

नवीन Hyundai i20 चा धुमाकूळ, 20 दिवसात 20 हजार युनिट्सचे रेकॉर्डब्रेक बुकिंग

डिसेंबरमध्ये किफायतशीर कार खरेदी करण्याची संधी, रेनॉ KWID वर 20,000 रुपयांचा डिस्काऊंट

Duster आणि Triber सह ‘या’ गाड्यांवर रेनॉ कंपनीकडून 70 हजार रुपयांपर्यंतची सूट

(End year offer on Hyundai Santro Grand i10, Up to Rs 1 Lakh discount On These Cars)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI