AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EV Bike: इराण युद्धाने ऊर्जा संकट, या स्टायलिश इलेक्ट्रिक बाईक मिटवतील चिंता, किंमत इतकी कमी, तुम्ही खरेदी करणार?

Stylish Electric Bike: मध्य-पूर्वेत मोठा संघर्ष सुरू आहे. पेट्रोल-डिझेलच्या अफवांनी आणि तुटवड्याने नागरिकांची चिंता वाढवली. अनेक जण इलेक्ट्रिक बाईककडे वळत आहेत. या पाच इलेक्ट्रिक बाईक तुमचे भविष्य बदलतील. त्यांची किंमत ही कमी आहे.

EV Bike: इराण युद्धाने ऊर्जा संकट, या स्टायलिश इलेक्ट्रिक बाईक मिटवतील चिंता, किंमत इतकी कमी, तुम्ही खरेदी करणार?
स्टायलिश इलेक्ट्रिक बाईकImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 01, 2026 | 2:09 PM
Share

Stylish Electric Bike: मध्य-पूर्वेत सुरू असलेली इस्त्रायल-अमेरिका-इराण युद्धाने अनेक सरकारच्या जीवाला घोर लावला आहे. इंधनाच्या किंमती आणि पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. युद्धाचा कच्चे तेल, नैसर्गिक गॅसवर थेट परिणाम दिसून येत आहे. भारतातही नागरीक हैराण झाल्याचे दिसले. पेट्रोल पंपावर गर्दी दिसली. तर गॅस एजन्सीबाहेर अजूनही रांगा आहेत. इराणने दोन दिवसांपूर्वीच कच्चा तेलाच्या किंमती 200 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहण्याचा इशारा दिला आहे. त्याचा परिणाम भारतावरही दिसू शकतो. अशा परिस्थितीत ग्राहकांसमोर इलेक्ट्रिक बाईकचा चांगला पर्याय आहे. या स्टायलिश बाईक तुमचा ताण कमी करू शकतात. या बाईकची किंमतही फार जास्त नसल्याने ग्राहकांच्या खिशावर ताण येणार नाही. तसेच मेन्टन्सचा खर्चही जास्त नाही.

इलेक्ट्रिक बाईकच्या विक्रीत वाढ

सध्याचे ऊर्जा संकट पाहता इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरचा वापर वाढला आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (FADA) आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात एकूण 1,11,709 इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी फेब्रुवारी 2025 मध्ये 76,722 यूनिट्सची विक्री झाली होती. एका वर्षात विक्रीत जवळपास 19 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली.

पाच इलेक्ट्रिक बाईक कोणत्या?

Revolt RV400 -भारतीय बाजारात विक्रीत सर्वात आघाडीवर Revolt RV400 ही इलेक्ट्रिक बाईक आहे. या बाईकची किंमत 1.32 लाख रुपये आहे. रिव्हॉल्ट आरव्ही 400 मध्ये 3.24 KWh ची बॅटरी येते. ही बाईक सिंगल चार्जमध्ये 150 किमीपर्यंत दामटता येते. या बाईकचा टॉप स्पीड 85 kmph इतकी आहे.

Komaki MX3- इलेक्ट्रिक बाईकमध्ये कोमाकीच्या दोन दमदार बाईक आहेत. कोमाकी एमएक्स 3 ची ( Komaki MX3 ) किंमत 95,000 रुपये इतकी आहे. सिंगल चार्जमध्ये ही बाईक 85 किमीचा पल्ला गाठते. तर कोमाकी रेंजरची (Komaki Ranger) किंमत 1.68 लाख रुपये आहे. सिंगल चार्ज बॅटरीआधारे ही बाईक 200 किमीपर्यंत टप्पा गाठते.

Hop Oxo – बाईक प्रेमींमध्ये ही दुचाकी लोकप्रिय आहे. होप ऑक्सोची (Hop Oxo) किंमत 1.64 लाख रुपये आहे. या बाईकमध्ये 3.75 Kwh बॅटरी आहे. एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक 150 किमीपर्यंत धावते आणि ही बाईक ताशी 95 किलोमीटर वेगाने धावते.

Oben Rorr – ओबेन रोरची किंमत 1.02 लाख रुपये आहे. या इलेक्ट्रिक मोटारसायकलमध्ये 4.4 kwh ची बॅटरी आहे. ही बाईक एकदा फुल चार्ज झाली की 200 किमी धावते. या बाईकचा टॉप स्पीड 100 kmph इतका आहे.

Matter Aera- ही बाईक नुकतीच लाँच झाली आहे. मॅटर ऐराची (Matter Aera) किंमत 1.43 लाख रुपये इतकी आहे. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 5 kWh ची बॅटरी आहे. एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक 125 किमी धावते.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?