AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इलेक्ट्रिक टू-व्हीलर’ ला आगीच्या घटनांबाबत शासन गंभीर; निष्काळजी कंपन्यांवर होणार कारवाई….केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे ‘ट्विट’ द्वारे दिली माहिती

इलेक्ट्रिक टू-व्हीलरला आग लागण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता, चूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध शासन गंभीर असून, या कंपन्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश काढण्यात येणार आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार अशा प्रकरणांमध्ये आवश्यक ते आदेश जारी करेल, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.

‘इलेक्ट्रिक टू-व्हीलर’ ला आगीच्या घटनांबाबत शासन गंभीर; निष्काळजी कंपन्यांवर होणार कारवाई....केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे ‘ट्विट’ द्वारे दिली माहिती
वाढत्या ऊस क्षेत्रावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे.Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 22, 2022 | 12:33 AM
Share

इलेक्ट्रिक टू-व्हीलर (ई व्हेईकल) मधील आगीच्या वाढत्या घटना (Increasing incidence of fires) लक्षात घेता, सरकार संबधित, कंपन्यांविरुद्ध आवश्यक आदेश जारी करणार आहे. अशा प्रकरणांमध्ये तज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार आवश्यक ते पाऊल उचलेल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. गडकरींनी ट्विटद्वारे सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकींशी (With electric bikes) संबंधित अनेक अपघात समोर आले आहेत. गडकरी म्हणाले की, या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजना करून, शिफारस करण्यासाठी त्यांनी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. अहवालाच्या आधारे ते निष्काळजी कंपन्यांवर आवश्यक आदेश जारी करतील. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की ते लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील. कोणत्याही कंपनीने आपल्या कार्यपद्धतीत निष्काळजीपणा (Negligence) दाखविल्यास त्याला मोठा दंड ठोठावला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत घेण्याचे आदेशही देण्यात येतील. (Government will take action against negligent companies regarding fire incidents of electric two wheeler Information given by Union Minister Nitin Gadkari through tweet)

गडकरींनी ट्विट करून दिली माहिती

गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकींशी संबंधित अनेक अपघात समोर आले आहेत. त्यांनी ट्विटर हँडलवर लिहिले की, काही लोकांना आपला जीव गमवावा लागला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि या घटनांमध्ये काही लोक जखमी झाले आहेत. यादरम्यान कंपन्या सर्व सदोष वाहनांच्या बैच तात्काळ परत मागवण्याची कारवाई करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील त्यांचे सरकार प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ट्विटमधून जाहीर केले आहे.

अहमदाबादमध्ये पहिले चार्जिंग स्‍टेशन सुरू

अदानी टोटल गॅस लिमिटेडने अहमदाबादमध्‍ये पहिले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्‍टेशन सुरू करून इलेक्ट्रिक मोबिलिटीच्‍या पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रवेश केला आहे. कंपनी अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा कंपनी Total Energies SE यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. अदानी टोटलने एका निवेदनात म्हटले आहे की, हे चार्जिंग स्टेशन अहमदाबादच्या मणिनगर येथील ATGL च्या CNG स्टेशनवर सुरू करण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे ईव्ही चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांना सर्वोत्तम-इन-क्लास चार्जिंग सुविधेसह आणि सोयीस्कर पद्धतीने डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यास सक्षम करेल. (Government will take action against negligent companies regarding fire incidents of electric two wheeler Information given by Union Minister Nitin Gadkari through tweet)

इतर बातम्या

Apple MagSafe Charger : Apple ने आणला एक नवीन ‘बॅटरी पॅक’, वायरलेस पद्धतीने, डिवाइस होईल काही मिनीटांतच चार्ज

Gaming Smartphones : वीस हजाराच्या आत सर्वोत्कृष्ट गेमिंग फोन; Redmi ते Poco पर्यंत, स्मार्टफोन कूलिंग टेक्नॉलॉजीसह अनेक पर्याय उपलब्ध !

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...