AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Nexon EV Max: न्यू ब्रँड Tata Nexon EV Max चे खास स्पेसिफिकेशन्स पाहिलेत का?

टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कारचे मॅक्स व्हेरिएंट Tata Nexon EV लाँच केले आहे. नुकतेच या कारचे आकर्षक फोटो व्हायरल झाले असून या लेखातून आपण लूक अन्‌ कारच्या स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Tata Nexon EV Max: न्यू ब्रँड Tata Nexon EV Max चे खास स्पेसिफिकेशन्स पाहिलेत का?
Tata Nexon EV Max Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 12:12 PM
Share

टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स (Tata Nexon EV Max) चा खास रंग ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. टाटा मोटर्सने नवीन ईव्ही मॅक्स लाँच करतानाच माहिती दिली होती की, ते एका खास रंगाच्या Intensi Teal मध्ये विकणार आहे. हा रंग फक्त नेक्सॉन ईव्ही मॅक्समध्ये उपलब्ध असेल. याशिवाय टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स डेटोना ग्रे आणि प्रिस्टीन व्हाईट या दोन रंगांमध्येही (Two colors) उपलब्ध करुन देण्याची माहिती देण्यात आली होती. नेक्सॉन ईव्ही मॅक्समध्ये बूट स्पेसमध्ये (Boot space) कोणतीही कमतरता नाही. कंपनीने या उच्च श्रेणीच्या कारमध्ये एक मोठा बॅटरी पॅक दिला आहे. पण त्यावर मॅक्सची वेगळी बॅच देण्यात आलेली नाही. एक मोठा बॅटरी पॅक जोडूनही आतील आणि बूट जागेचा आकार फारसा बदललेला नाही.

350 किमीपर्यंत रेंज

नवीन Tata Nexon EV Max चा बॅटरी पॅक मागील Nexon EV पेक्षा जवळपास 30 टक्के जास्त आहे. कंपनीचा दावा आहे, की ते एका चार्जमध्ये 437 किमी मायलेज देईल. परंतु हे मायलेज स्टेंडर्ड कंडिशनमध्ये तपासले गेले आहे. सामान्य परिस्थितीत म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये रेंज 350 किमीपर्यंत राहणे अपेक्षित आहे. ही रेंज नेहमीच्या Nexon EV पेक्षा खूप जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

फास्ट चार्ज होईल

Tata Nexon EV Max केवळ जास्त रेंजच देणार नाही, तर ते जलद चार्जिंगसाठी देखील सक्षम राहणार आहे. यासह कंपनी पर्यायामध्ये 7.2 kW एसी फास्ट चार्जर देईल, ज्यामुळे कार केवळ 6.5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊ शकते. व्यावसायिकरित्या वापरल्या जाणार्‍या 50kW डीसी चार्जरसह ते फक्त 56 मिनिटांत 0-80 टक्केपर्यंत चार्ज होईल. दरम्यान, Tata Nexon EV Max ची इलेक्ट्रिक मोटर 143 पीएसची कमाल पॉवर जनरेट करते. तर यामध्ये तुम्हाला 250 एनएम इन्स्टंट टॉर्क मिळतो. ही कार अवघ्या 9 सेकंदात 0-100 kmph चा वेग पकडते. तर त्याचा टॉप स्पीड देखील 140 किमी प्रतितास इतका वाढला आहे.

दोन प्रकारात उपलब्ध

कंपनीने Tata Nexon EV Max 2 प्रकारात बाजारात आणली आहे. हे प्रकार XZ+ आणि XZ+ लक्स आहेत. तर वेगवेगळ्या चार्जर पर्यायांसह 4 वेगवेगळ्या किंमती आहेत. त्याची किंमत 17.74 लाख रुपयांपासून 19.24 लाख रुपयांपर्यंत असेल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.