AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hayabusa बाईकसारखा लूक आणि दमदार फीचर्स, तब्बल 400Kmph वेगाने धावणारी इलेक्ट्रिक बाईक बाजारात

यूके-बेस्ड व्हाइट मोटरसायकल कॉन्सेप्ट्सने WMC250EV हा एक इलेक्ट्रिक बाइक प्रोटोटाइप सादर केला आहे, 400 किमी प्रतितास वेग साध्य करणे हे यामागचे मुख्य उद्दीष्ट आहे.

Hayabusa बाईकसारखा लूक आणि दमदार फीचर्स, तब्बल 400Kmph वेगाने धावणारी इलेक्ट्रिक बाईक बाजारात
Hayabusa Inspired Electric Bike
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 3:49 PM
Share

लंडन : यूके-बेस्ड व्हाइट मोटरसायकल कॉन्सेप्ट्सने WMC250EV हा एक इलेक्ट्रिक बाइक प्रोटोटाइप सादर केला आहे, नवीन इलेक्ट्रिक लँड स्पीड रेकॉर्ड स्थापित करणे, हा यामागचा हेतू आहे. गेल्या वर्षी वोक्सन वॉटमॅनवर इलेक्ट्रिक बाईक मोटोजीपी लीजेंड मॅक्स बियागीने बनवलेला 367 किमी प्रतितास वेगाचा रेकॉर्ड मोडणे आणि 400 किमी प्रतितास वेग साध्य करणे हे यामागचे मुख्य उद्दीष्ट आहे. (Hayabusa inspired electric bike can break speed record at 400 kmph, know more)

या प्रोटोटाइपमध्ये युनिक एरोडायनॅमिक डिझाइन देण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याचं बॉडी डिझाइन सेकेंड जनरेशन सुझुकी हयाबुसापासून प्रेरित आहे. या बाईकमध्ये सेंटरला डक्ट आहे, ज्याला व्ही-एअर असे नाव देण्यात आले आहे. असे म्हटले जाते की, यामुळे इलेक्ट्रिक बाईकचा ड्रॅग गुणांक सुमारे 70% कमी होतो. या डिझाइनमुळे हवा दुचाकीच्या बाजूने नव्हे तर बाईकमधून बाहेर निघेल. या डिझाइनमध्ये विंगलेट्स समाविष्ट नाहीत जे सामान्यत: डाउनफोर्स वाढविण्यासाठी जोडले जातात, तथापि, ईव्ही निर्माता कंपनीने दावा केला आहे की, सामान्य दुचाकीच्या तुलनेत डब्ल्यूएमसी 250 ईव्हीचा (WMC250EV) फ्रंट लोड पाच पट अधिक आहे.

या इलेक्ट्रिक बाईकमध्ये रियर व्हीलसाठी 30kW मोटर देण्यात आली असून फ्रंट व्हीलसाठी दोन 20kW मोटर्स देण्यात आल्या आहेत. यामुळे 134 एचपी इतकी पॉवर जनरेट होऊ शकते. परंतु पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकच्या पॉवरपेक्षा या बाईकची पॉवर अधिक वाटत नाही. अहवालात असेही म्हटले आहे की, 2022 पर्यंत, जेव्हा कंपनी बोलिव्हिया सॉल्ट फ्लॅट्समध्ये विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा कंपनी या बाईकची पॉवर वाढवेल.

Hayabusa Inspired Electric Bike

इफेक्टिव्ह पॉवर ट्रान्समिशनसाठी या बाईकमध्ये एक मशीन्ड अलॉय स्विंगआर्म आहे, जे बाईकला स्वच्छ ठेवण्याचं काम करेल. तसेच ड्राईव्ह आणि संचालित स्प्रॉकेटला लुब्रिकेट करतो. या बाईकचे वजन 300 किलोग्रॅम इतके असून त्यास फ्रंटला ट्विन 340mm डिस्क आणि मागील बाजूस 310mm डिस्कब्रेक देण्यात आला आहे. हे ब्रेक्स EBC शी जोडलेले आहेत आणि HEL ब्रेक लाइनशीदेखील कनेक्टेड आहेत. ही बाईक डायमॅग अॅल्यूमिनियम 17-इंचांच्या अलॉय शोडवर चालते, जी पिरेली स्लिक्ससह येते.

इतर बातम्या

Ola इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, कंपनीच्या संस्थापकांनी विचारलं तुम्हाला कोणता रंग हवा आहे?

अवघ्या 1.5 युनिट वीजेवर चार्ज होणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर 20000 रुपयांचा डिस्काऊंट

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकी 28 हजार रुपयांनी स्वस्त

(Hayabusa inspired electric bike can break speed record at 400 kmph, know more)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.