AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या दोन तासात सर्व बाईक्सची विक्री, ‘या’ इलेक्ट्रिक बाईकसाठी ग्राहकांच्या रांगा

भारतात सध्या इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वेगाने वाढत आहे. त्यातही प्रामुख्याने रिव्होल्ट मोटर्सची (Revolt Motors) इलेक्ट्रिक बाईक आरव्ही 400 (RV400) ची लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे.

अवघ्या दोन तासात सर्व बाईक्सची विक्री, 'या' इलेक्ट्रिक बाईकसाठी ग्राहकांच्या रांगा
Revolt Rv400
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 3:42 PM
Share

मुंबई : भारतात सध्या इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वेगाने वाढत आहे. त्यातही प्रामुख्याने रिव्होल्ट मोटर्सची (Revolt Motors) इलेक्ट्रिक बाईक आरव्ही 400 (RV400) ची लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. प्रत्येक वेळी या बाईकचे बुकिंग सुरु केल्यानंतर अवघ्या काही तासांतच बुकिंग बंद होते. 18 जून रोजी या बाईकचे बुकिंग पुन्हा सुरू झाले आणि अवघ्या दोनच तासांत कंपनीने बुकिंग घेणे थांबविले. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी 50 कोटी रुपयांच्या बाइक्स बुक केल्या आहेत. (Revolt sold all units of RV400 Bikes in just 2 hours, booking closed)

कंपनीने म्हटले आहे की, रिव्होल्ट आरव्ही 400 (Revolt RV400) इलेक्ट्रिक बाईकसाठी अधिक बुकिंग्स प्राप्त झाल्या आहेत, कारण सरकारच्या फेम II (FAME II) अनुदानानंतर या बाईकच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. फेम II अनुदानामध्ये सुधारणा केल्यानंतर दिल्लीतील ग्राहकांना ही बाईक एक लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. यासह कंपनीने असेही म्हटले आहे की, त्यांनी भारतातील 35 शहरांमध्ये आपली वितरक सेवा वाढवण्यास सुरुवात केले आहे.

Revolt Motors ने म्हटले आहे की, भारतातील अनेक शहरांमध्ये या इलेक्ट्रिक बाईकला मोठी मागणी आहे. कंपनीने म्हटले आहे की, दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबादसह 6 शहरांमध्ये या बाईकला चांगली पसंती मिळत आहे आणि लोक ही बाईक बुक करण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत.

सिंगल चार्जवर 150 किलोमीटर धावणार

Revolt RV 400 इलेक्ट्रिक बाइकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास ही बाईक सिंगल चार्जमध्ये 150 किमीची रेंज देते. या बाईकचं टॉप स्पीड ताशी 85 किमी इतकं आहे. कंपनीने यात 3.24 किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली असून या बॅटरीसह कंपनीकडून 1,50,000 किलोमीटरची वॉरंटी देण्यात आली आहे. यामध्ये आपणास Eco, Normal आणि Sports असे तीन रायडिंग मोड्स मिळतील. या बाईकमधील लिथियम आयन बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एकूण साडेचार तास लागतात.

ही बाईक डेडिकेटेड MyRevolt मोबाइल अ‍ॅपसह सादर करण्यात आली आहे, जी जिओफेन्सींग, ट्रिप डिटेल्स, क्लोज चार्जिंग स्टेशनची माहिती आणि पसंतीचे एक्झॉस्ट साऊंडसारखे फीचर्स ऑफर करते. त्याचप्रमाणे, आरव्ही 300 मध्ये 1500W रेटिंग वाली मोटार देण्यात आली आहे, जी जास्तीत जास्त ताशी 65 किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकते आणि त्यामध्ये 2.7kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

इतर बातम्या

Dhoom सिनेमात जॉनने वापरलेली Hayabusa बाईक भारतात परतणार, स्पीडचा रेकॉर्ड किती?

अवघ्या 1200 रुपयात घरी न्या Bajaj ची शानदार बाईक, एक लीटर पेट्रोलमध्ये 90 किमी मायलेज

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

(Revolt sold all units of RV400 Bikes in just 2 hours, booking closed)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.