सिंगल चार्जमध्ये 150KM धावणार, तुफान मागणीमुळे ‘या’ इलेक्ट्रिक बाईकचं बुकिंग थांबवलं

प्रचंड मागणीमुळे Revolt Motors ने आपल्या दोन इलेक्ट्रिक बाइक्स आरव्ही 400 (RV400) आणि आरव्ही 300 (RV300) चे बुकिंग बंद केले आहे.

सिंगल चार्जमध्ये 150KM धावणार, तुफान मागणीमुळे 'या' इलेक्ट्रिक बाईकचं बुकिंग थांबवलं
Revolt Rv400
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 8:56 PM

मुंबई : प्रचंड मागणीमुळे रिव्होल्ट मोटर्सने (Revolt Motors) आपल्या दोन इलेक्ट्रिक बाइक्स आरव्ही 400 (RV400) आणि आरव्ही 300 (RV300) चे बुकिंग बंद केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादामुळे मोठ्या प्रमाणात बुकिंग्स झाल्या आहेत. त्यामुळे बुकिंग थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, आपल्याला ही बाइक बुक करायची असल्यास वेबसाइटवर जाऊन आपला तपशील देऊ शकता, त्यानंतर बुकिंग सुरू होताच तुम्हाला याबाबतची माहिती दिली जाईल. (Revolt RV400 and RV300 electric bikes booking stopped due to high demand)

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिव्होल्ट मोटर्सने त्यांच्या इलेक्ट्रिक बाइक्सच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ केली होती. कंपनीने आरव्ही 400 ची किंमत 15,000 रुपयांनी वाढविली होती, त्यानंतर त्याची किंमत 1,18,999 रुपये करण्यात आली. त्याच वेळी आरव्ही 300 ची किंमत 10000 रुपयांनी वाढविण्यात आली होती. त्यामुळे या बाईकची किंमत 94,999 रुपये इतकी झाली आहे. या एक्स शोरुम किंमती आहेत.

याशिवाय बाईकच्या बुकिंगची रक्कमही कंपनीने वाढविली आहे. सध्या ग्राहकांना आरव्ही 400 च्या बुकिंगसाठी 7,999 रुपये आणि आरव्ही 300 च्या बुकिंगसाठी 7,199 रुपये द्यावे लागत होते. पण आता दोन्ही बाईकच्या बुकिंगच्या किंमतीत अनुक्रमे 4000 आणि 5200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सिंगल चार्जवर 150 किलोमीटर धावणार

Revolt RV 400 इलेक्ट्रिक बाइकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास ही बाईक सिंगल चार्जमध्ये 150 किमीची रेंज देते. या बाईकचं टॉप स्पीड ताशी 85 किमी इतकं आहे. कंपनीने यात 3.24 किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली असून या बॅटरीसह कंपनीकडून 1,50,000 किलोमीटरची वॉरंटी देण्यात आली आहे. यामध्ये आपणास Eco, Normal आणि Sports असे तीन रायडिंग मोड्स मिळतील. या बाईकमधील लिथियम आयन बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एकूण साडेचार तास लागतात.

ही बाईक डेडिकेटेड MyRevolt मोबाइल अ‍ॅपसह सादर करण्यात आली आहे, जी जिओफेन्सींग, ट्रिप डिटेल्स, क्लोज चार्जिंग स्टेशनची माहिती आणि पसंतीचे एक्झॉस्ट साऊंडसारखे फीचर्स ऑफर करते. त्याचप्रमाणे, आरव्ही 300 मध्ये 1500W रेटिंग वाली मोटार देण्यात आली आहे, जी जास्तीत जास्त ताशी 65 किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकते आणि त्यामध्ये 2.7kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

VIDEO | टाटाची E-Car चार्ज करण्यासाठी गाडीवर पवनचक्की, कारमालकाचा प्रयोग फसला?

इंधन दरवाढीवर जालीम उपाय, एकदा चार्ज करा आणि सुस्साट फिरा, 130KM रेंजसह ई. स्कूटर बाजारात

(Revolt RV400 and RV300 electric bikes booking stopped due to high demand)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.