मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकी 28 हजार रुपयांनी स्वस्त

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 26, 2021 | 12:07 PM

Electronic scooter | इंधनाचे वाढलेले दर पाहता इलेक्ट्रॉनिक वाहने ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्कुटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठी सूट मिळू शकते.

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकी 28 हजार रुपयांनी स्वस्त
इलेक्ट्रॉनिक दुचाकी

Follow us on

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे अनेकजण खासगी वाहनातून प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. जेणेकरून सार्वजनिक वाहनांमधील गर्दीच्या ठिकाणी असणारा कोरोनाचा धोका टाळता येईल, असा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे विक्री मंदावल्याने दुचाकी आणि चारचाकी स्वस्तही झाल्या होत्या. अशातच भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक वाहनांनी (Electronic Vehiles) प्रवेश केला होता. इंधनाचे वाढलेले दर पाहता इलेक्ट्रॉनिक वाहने ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्कुटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठी सूट मिळू शकते. (Electronic scooters in India price drop up to 28000 after amedment of fame ii scheme)

मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणला आहे. भारतात इलेक्ट्रॉनिक्स वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला. तसेच केंद्र सरकारकडून नुकतेच FAME II नियमात सुधारणाही करण्यात आल्या. त्यामुळे देशात इलेक्ट्रॉनिक वाहने आणखी स्वस्त होऊ शकतात.

वाहनांच्या खरेदीसाठी जादा अनुदान

FAME II नियमात सुधारणा झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकींवर जादा अनुदान मिळेल. यापूर्वी इलेक्ट्रॉनिक दुचाकींवर प्रति kWh 10 हजार रुपये अनुदान मिळत असे. आता त्यामध्ये 5 हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे.

या कंपन्यांनी दुचाकीच्या किंमती घटवल्या

मोदी सरकारच्या निर्णयानंतर TVS कंपनीने TVS iQube इलेक्ट्रॉनिक स्कुटरची किंमत कमी केली आहे. या स्कुटरची किंमत 11,250 रुपयांनी कमी झाली आहे. तर Okinawa ने Okinawa iPraise+ या इलेक्ट्रॉनिक दुचाकीच्या मॉडेलची किंमत 7,200 ते 17,900 रुपयांनी घटवली आहे. Revolt Motors कंपनीच्या RV 400 इलेक्ट्रॉनिक बाईकच्या किंमतीत 28,200 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात ओलाची ई-स्कुटर बाजारपेठेत

कॅब सेवा पुरवणाऱ्या ओला कंपनीची इलेक्ट्रॉनिक स्कुटर जुलै महिन्यात बाजारपेठेत दाखल होणार आहे. ओलाचे संस्थापक भावेश अग्रवाल यांनी या स्कुटरचा रंग कोणता असावा, यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. तसेच ‘ओला’ने अनेक शहरांमध्ये हायपर चार्जर नेटवर्कची उभारणी सुरु केली आहे. ओला देशातील 400 शहरांमध्ये एक लाख चार्जिंग पॉईंटस उभारणार आहे.

संबंधित बातम्या

Tesla ने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं, अन्यथा… नितीन गडकरींचा सल्लावजा इशारा

इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचं टेन्शन खल्लास, मुंबईत 10 नवे चार्जिंग स्टेशन्स सुरु

‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात मोठी मागणी, आणखी दोन शहरात लाँच होणार

(Electronic scooters in India price drop up to 28000 after amedment of fame ii scheme)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI