‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात मोठी मागणी, आणखी दोन शहरात लाँच होणार

इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये बजाज ऑटोच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला (Bajaj Chetak Electric Scooter) चांगली पसंती मिळत आहे,

'या' इलेक्ट्रिक स्कूटरला देशात मोठी मागणी, आणखी दोन शहरात लाँच होणार
Bajaj Chetak
अक्षय चोरगे

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 19, 2021 | 7:04 AM

मुंबई : इलेक्ट्रिक टू व्हीलर (Electric Two Wheeler) सेगमेंटमध्ये बजाज ऑटोच्या (Bajaj Auto) चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला (Bajaj Chetak Electric Scooter) चांगली पसंती मिळत आहे, म्हणूनच या स्कूटरसाठीची मागणीही खूप वेगाने वाढत आहे. कंपनीने अलीकडेच या स्कूटरचे बुकिंग सुरू केले आहे, परंतु मोठ्या मागणीमुळे हे बुकिंग दोन दिवसातच थांबवावे लागले. (Bajaj Chetak Electric Scooter going to launched in Chennai and Hyderabad)

बजाज कंपनी या स्कूटरचे उत्पादन वाढवत आहे, जेणेकरून मागणी पूर्ण होऊ शकेल. याशिवाय ही विक्री वाढविण्यासाठी कंपनी पुणे आणि बंगळुरूनंतर आणखी दोन शहरांमध्ये ही स्कूटर सादर करणार आहे. लवकरच ही बॅटरी-पॉवर्ड इलेक्ट्रिक स्कूटर चेन्नई आणि हैदराबादमध्ये लाँच केली जाईल. डिसेंबर 2020 पर्यंत बजाजकडे एकूण 18 डेडिकेटेड चेतक डीलरशीप्स होत्या. ज्यापैकी 5 पुण्यात आणि उर्वरित डीलरशीप्स बंगळुरुत आहेत.

या स्कूटरची वाढती मागणी लक्षात घेता बजाजने या स्कूटरच्या किंमतीत वाढ केली आहे. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एकूण 27000 रुपयांनी वाढवण्यात आली असून त्याची किंमत वाढून आता 1,42,620 रुपये झाली (एक्स-शोरूम, पुणे) आहे. कंपनीने मार्च 2021 मध्येदेखील या स्कूटरच्या किंमतीत 5 हजार रुपयांची वाढ केली होती.

किंमत

ही स्कूटर अ‍ॅथर 450 एक्स (Ather 450X) आणि TVS iQube ला जोरदार टक्कर देत आहे. ही स्कूटर 1.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या किंमतीसह लाँच करण्यात आली होती. आता या स्कूटरची किंमत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही स्कूटर 1.47 लाख (एक्स-शोरूम) रुपये या किंमतीत विकली जात आहे. फेम – 2 आणि राज्य अनुदानानंतर (स्टेट सबसिडी) या स्कूटरची किंमत 1.08 लाख (एक्स-शोरूम) इतकी झाली आहे. तर किरकोळ बाजारात या स्कूटरची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स

ही इलेक्ट्रिक स्कूटर अर्बन आणि प्रीमियम या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात 3 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक आणि 4.08 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. सिंगल चार्जवर ही स्कूटर 95 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. या स्कूटरची बॅटरी केवळ 5 तासात पूर्णपणे चार्ज करू शकता. या स्कूटरमधील इतर फीचर्सविषयी सांगायचे झाल्यास यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, key लेस स्टार्ट-स्टॉप सिस्टम आणि डिझायनर अ‍ॅलोय व्हील्स देण्यात आले आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. त्याशिवाय हँडलिंगसाठी यामध्ये कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस) देखील देण्यात आली आहे.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचं टेन्शन खल्लास, मुंबईत 10 नवे चार्जिंग स्टेशन्स सुरु

Hero च्या ‘या’ दोन स्वस्त बाईक्सपैकी तुमच्यासाठी परफेक्ट कोणती? किंमतीत केवळ 1300 रुपयांचा फरक

Hero Destini 125 वर मोठी सूट, स्कूटरमध्ये नवं हिरो कनेक्ट फीचरही मिळणार

(Bajaj Chetak Electric Scooter going to launched in Chennai and Hyderabad)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें