Hit and Run | ‘ही’ विमा पॉलिसी हवी, तर अपघातानंतर कार मालकासह आतमध्ये बसलेल्या व्यक्तींना मिळते कव्हर

Hit and Run New Law | हिट एंड रनच्या कायद्यावरुन देशभरात ट्रक आणि बस चालक बेमुद संपावर गेले होते. सध्या ड्रायव्हरसाठी हा कायदा लागू करायचा नाही, असा निर्णय घेतलाय. हिट एंड रन केसमध्ये अपघातामुळे पीडित व्यक्तीला किती भरपाई मिळते त्या बद्दल जाणून घेऊया.

Hit and Run | 'ही' विमा पॉलिसी हवी, तर अपघातानंतर कार मालकासह आतमध्ये बसलेल्या व्यक्तींना मिळते कव्हर
Car accident
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 2:50 PM

Hit and Run Case | हिट एंड रन कायद्यातील नव्या तरतुदींवरुन देशात सध्या वादविवाद सुरु आहेत. देशातील अनेक राज्यात बस आणि ट्रक ड्रायव्हर संपावर गेले आहेत. सध्या सरकारने हिट एंड रन कायदा लागू न करण्याचा निर्णय घेतलाय. भारतात रस्ते अपघात एक मोठी समस्या आहे. यातील बहुतेक अपघात हे हिट एंड रन वर्गात येणारे असतात. या प्रकारात वाहन चालक एखाद्याला धडक देतो आणि पळून जातो. यामध्ये पीडित व्यक्तीला गंभीर दुखापत होऊ शकते किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो.

इंडियन मोटर व्हीकल एक्टनुसार, सर्व मोटार गाड्यांच्या मालकांना इंश्योरेंस करण अनिवार्य आहे. इंश्योरेंसचे अनेक प्रकार असतात. यात एक असतो कॉम्प्रिहेंसिव इंश्योरेंस. कॉम्प्रिहेंसिव इंश्योरेंसमध्ये गाडीशिवाय गाडीत बसलेल्या लोकांना सुद्धा कव्हर मिळतं.

भरपाईची रक्कम कशी ठरते?

समजा तुम्ही घरातून गाडी घेऊन निघालात आणि कोणी तुमच्या गाडीला टक्कर मारली आणि तो पळून गेला, तर हा हिट एंड रनचा विषय बनतो. तुम्ही कॉम्प्रिहेंसिव इंश्योरेंस घेतला असेल, तर तुम्हाला भरपाई मिळू शकते. भरपाईची रक्कम गाडीची इंश्योरेंस पॉलिसीच्या नियमांच्या हिशोबाने ठरवली जाते.

Hit and Run : किती भरपाई मिळते?

भारतात हिट एंड रन प्रकरणात कॉम्प्रिहेंसिव पॉलिसी अंतर्गत पीडित व्यक्तीला भरपाई मिळू शकते. मृत्यूच्या प्रकरणात 2 लाख रुपये

गंभीररित्या जखमी झाल्यास 50 हजार रुपये.

कटारिया इंश्योरेंसचे मोटर हेड संतोष सहानी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की, “हिट एंड रन प्रकरणात कॉम्प्रेहेंसिव पॉलिसीने इंश्योर्ड व्यक्तीला ऑन-द-स्पॉट डेथ झाल्सास 2,00,000 रुपयापर्यंत भरपाई मिळू शकते. त्यासाठी इन्वेस्टिगेशन प्रोसेस आवश्यक आहे.

भरपाईची रक्कम पीडिताच्या कुटुंबाला किंवा कायदेशीर प्रतिनिधीला दिली जाते. वेगवेगळ्या इंश्योरेंस कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रक्कमेत फरक असू शकतो.

Hit and Run : हे डॉक्यूमेंट्स आवश्यक

हिट एंड रन प्रकरणात भरपाईचा दावा करण्यासाठी इंश्योर्ड पीडीत पर्सनला डॉक्यूमेंट्स जमा करावे लागतील. मृत्यूच्या विषयात मृत्यु प्रमाणपत्र आवश्यक

गंभीर जखमी झाल्यास रुग्णालयाचा मेडिकल रिपोर्ट

एक्सीडेंट रिपोर्ट: FIR आणि पोलिसांचा दुर्घटना रिपोर्ट

पीडित व्यक्तीकडे हे डॉक्युमेंट नसतील, तर तो भरपाईसाठी दावा करु शकत नाही. एक्सीडेंटनंतर लगेच पोलिसांना या बद्दल सांगाव लागेल. त्याशिवाय दुर्घटनास्थळावरुन पुरावे गोळा करावे लागतील. ज्या गाडीचा अपघात झाल्यास त्याचे तुकडे, गाडीची नंबर प्लेट आणि साक्षीदारांची जबानी.

Hit and Run: अर्ज करण्याची प्रोसेस काय?

हिट एंड रन एक गंभीर अपराध आहे. पीडिताला यामुळे खूप त्रास होतो. हिट एंड रन प्रकरणात भरपाईचा दावा करण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करा.

दुर्घटनेनंतर लगेच पोलिसांना सूचित करा. पोलीस एक एक्सीडेंट रिपोर्ट जारी करतील.

डॉक्टरांकडून उपचार घ्या : तुम्हाला रुग्णालयातून एक मेडिकल रिपोर्ट मिळेल.

इंश्योरेंस कंपनीकेड क्लेम फॉर्म जमा करा: क्लेम फॉर्ममध्ये एक्सीडेंटच्या सर्व डिटेल्सची माहिती द्या. सर्व आवश्यक डॉक्यूमेंट्स क्लेम फॉर्मसोबत जोडा.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.