AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honda : होंडाने लाँच केली नवीन स्कूटर, पॉवरफूल इंजिनसह अनेक नवीन फीचर्स

लेटेस्ट स्कूटरमध्ये अनेक नवीन स्पेसिफिकेशन्स देण्यात आलेले आहेत. होंडा एअरब्लेड 160 ही कंपनीची सहावी जनरेशन एअरब्लेड हाई परफॉर्मेंस स्कूटर ठरणार आहे. दरम्यान, सध्या ही स्कूटर होंडाने व्हिएतनाममध्ये लाँच केली असून भारतात ती कधी येणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Honda : होंडाने लाँच केली नवीन स्कूटर, पॉवरफूल इंजिनसह अनेक नवीन फीचर्स
honda Airblade 160Image Credit source: social
| Edited By: | Updated on: Jun 01, 2022 | 6:08 PM
Share

मुंबई : होंडाने इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपली दमदार स्कूटर होंडा एअरब्लेड 160 (honda Airblade 160) लाँच केली आहे. लेटेस्ट स्कूटरमध्ये अनेक नवीन स्पेसिफिकेशन्स देण्यात आलेले आहेत. सोबत होंडा एअरब्लेड 160 ही कंपनीची सहावी जनरेशन एअरब्लेड हाई परफॉर्मेंस स्कूटर ठरणार आहे. दरम्यान, सध्या ही स्कूटर होंडाने व्हिएतनाममध्ये (Vietnam) लाँच केली असून भारतात ती कधी दाखल होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या आधी यामाहा एरोक्स 155 (Yamaha Aerox 155) च्या लाँचिंगमुळे भारतात दमदार आणि हाय परफॉर्मेंस स्कूटरची सुरुवात झालेली आहे. कंपनीने एअरब्लेड 160 ला नवीन अपडेट्‌स आणि होंडा व्हरिओ 160 सोबत बाजारात आणले आहे.

होंडा एअरब्लेडचे स्पेसिफिकेशन्स असे

एअरब्लेड 160 च्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, कंपनीन जुने मॉडेल 150 सीसी युनिटच्या ऐवजी 160 सीसी पॉवरफूल सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. एका रिपोर्टनुसार, याच्या इंजिनची परफॉर्मेंस Yamaha Aerox 155 पेक्षा जास्त चांगले आहे. तर दुसरीकडे होंडाने भारतात तीन स्कूटर्ससाठी पेटेंटची नोंद केली आहे. यात X-ADV स्कूटर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही स्कूटरदेखील एअरब्लेडसारखीच 160 सीसी प्लेटफॉर्मवर बेस्ड असणार आहे.

होंडा एअरब्लेड 160 मध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आलेले आहेत. ही स्कूटर ऑल एलईडी लाइटिंग, फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि सीटाच्या खाली 23.2 लीटर अंडरसीट स्टोरेजसह मिळणार आहे. वापरकर्त्यांना अंडरसीट स्टोरेजमध्ये लाइटसह युएसबी चार्जरदेखील मिळणार आहे. यात एक सस्पेंशन सेटअप मिळणार आहे. ज्यात पुढच्या भागात टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियरमध्ये ट्‌विन शॉक एब्जॉर्बरचाही समावेश असणार आहे. एअरब्लेड 160  चा लूकदेखीन खूप छान असणार आहे. यात एक अपडेटेड हेडलाइट क्लस्टर देण्यात आले असून त्याशिवाय बॉडी पॅनलचे डिझाईनदेखील बदलण्यात आले आहे. याचे जास्तकरुन डिझाईन एअरब्लेडच्या मागील मॉडेलवर बेस्ड असलेले आहे.

काय असणार किंमत?

कंपनीने होंडा एअरब्लेड 160 ला व्हियतनाममध्ये VND 55,990,000 म्हणजे सुमारे 1.87 लाख रुपयांमध्ये लाँच केले आहे. यामाहा एरोक्स 155 च्या तुलनेत होंडाच्या स्कूटरची किंमत जास्त आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.