Honda च्या बाईक-स्कूटर्समध्ये Bluetooth Connectivity मिळणार, जाणून घ्या तुम्हाला कसा फायदा होईल

| Updated on: May 27, 2021 | 5:02 PM

Honda Motorcycle and Scooter India मार्च 2021 मध्ये RoadSync नावाने ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता, जो आता स्वीकारला गेला आहे.

Honda च्या बाईक-स्कूटर्समध्ये Bluetooth Connectivity मिळणार, जाणून घ्या तुम्हाला कसा फायदा होईल
Follow us on

मुंबई : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India) मार्च 2021 मध्ये RoadSync नावाने ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता, जो आता स्वीकारला गेला आहे. जागतिक स्तरावर, होंडा कंपनी टू व्हीलर अॅप व्हॉइस कंट्रोल सिस्टमसह कार्य करते, जे आपण H’ness CB350 मध्ये देखील पाहिले आहे. परंतु यासाठी हेडसेट वापरणे आवश्यक आहे. (Honda Motorcycle And Scooter India May Introduce Bluetooth Connectivity in their Two Wheelers)

आता जर भारतीय बाजारपेठ म्हणून पाहिले तर, त्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सिस्टम मिळू शकते, जी आपण यापूर्वीही भारतातील अनेक दुचाकी वाहनांमध्ये पाहिली आहे. दुचाकी बाजारात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचरची सुरुवात टीव्हीएस NTorq 125 ने सुरू केली आणि आता तीन वर्षांनंतर टीव्हीएस, हिरो मोटोकॉर्प, सुझुकी आणि रॉयल एनफील्डसारख्या कंपन्यादेखील असे फीचर्स देत आहेत. या फीचरच्या मदतीने युजर्सला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट असे फीचर्स मिळतात.

आपल्याला होंडा रोडसिंकमध्येदेखील असेच फीचर्स मिळू शकतात, विशेषतः डिजिटल डिस्प्ले जो आपण याआधी Grazia 125, Hornet 2.0, X-Blade मध्ये पाहिला आहे. होंडा प्रीमियम टू व्हीलरमध्ये नेमके हेच फीचर्स दिले जाऊ शकतात.

काय आहेत या फीचर्सचे फायदे

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, आपली गाडी सुरु असतानाही आपण कनेक्टेड असता. त्याच वेळी, टर्न बाय टर्न आणि HMSI फीचर व्हीकल Diagnostics, जिओ फेंसिंग, म्युझिक आणि इतर फंक्शन्स आहेत. होंडा या फीचरला स्टँडर्ड बनवू शकते, किंवा ऑप्शनल फिटमेंट प्रमाणे ग्राहकांसमोर सादर करु शकते.

हल्लीच्या दुचाकी कंपन्या ग्राहकांना अनेक हाय-टेक फीचर्स देत असतात. पूर्वी दुचाकी इतकी अॅडव्हान्स मानल्या जात नव्हत्या, परंतु आता या वाहनांमध्ये छोट्या कार्समध्ये मिळणारे अनेक फीचर्स दिले जातात.

इतर बातम्या

सिंगल चार्जमध्ये 240Km रेंज,’या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्ससमोर अनेक मोठ्या बाईक फेल

‘या’ इलेक्ट्रिक सायकलसमोर ऑटो फेल, एकदा चार्ज केल्यावर 100 किमी धावणार

सिंगल चार्जमध्ये 483 किमी रेंज, Ford च्या ‘या’ गाडीसाठी ग्राहकांच्या रांगा, एका दिवसात 20,000 बुकिंग्स

(Honda Motorcycle And Scooter India May Introduce Bluetooth Connectivity in their Two Wheelers)